Smuggling File Photo
मुंबई

Dharavi News: धारावीतून दोन ड्रग्ज तस्करांकडून पावणेदोन कोटींचा साठा जप्त

धारावी परिसरात शुक्रवारी सायंकाळी कांदिवली युनिटचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत होते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: धारावी परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना कांदिवली युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी पावणेदोन कोटीचा एमडीसह गांजावा साठा जप्त केला आहे.

या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना शनिवारी दुपारी किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. धारावी परिसरात शुक्रवारी सायंकाळी कांदिवली युनिटचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत होते.

होळी मैदानाजवळ गस्त घालणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ यांच्या पथकातील एपीआय विजय नाईक, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, निखील शेळके, सहाय्यक फौजदार विनोद निकम, पोलीस हवालदार देसाई, चौधरी, तांबोळी, राणे, पोलीस शिपाई रोकडे, मोरे, नेहे आदी दोन संशशित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

त्यांच्या अंगझडतीत पोलिसांनी ६६ लाखांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. तपासात ते दोघेही धारावी परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही होळी मैदानाजवळ एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी आले होते. मात्र ड्रग्जची डिलीव्हरी करण्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली.

या दोघांच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी तिथे आणखीन एमडी ड्रग्ज आणि गांजाचा साठा सापडला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी १ कोटी ७५ लाख ६० हजार रुपयांचा ४३९ ग्रॅम वजनाचे एमडी, १६ हजार ९२० रुपयांचा ४२३ ग्रॅम गांजा आणि ४० हजार रुपयांचे दोन मोबाईल असा १ कोटी ७६ हजार १६ हजार ९२० रुपयांचा साठा जप्त केला आहे.

या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठीद पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT