Devendra Fadnavis On Sonia Gandhi pudhari
मुंबई

Devendra Fadnavis On Sonia Gandhi: पूर्ण वंदे मातरम् न म्हणणं हा दिमागी नक्सलवाद... फडणवीसांचा काँग्रेसला टोला

Anirudha Sankpal

Devendra Fadnavis On Sonia Gandhi: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जनतेला देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन होण्याची कामना करतो. असं देखील म्हणाले.

फडणवीस यांनी शुभेच्छा देताना काँग्रेसला देखील खोचक टोला मारला. काँग्रेस मुख्यालयातील झेंडा वंदनाच्या कार्यक्रमावेळी पूर्ण वंदे मातरम् गाण्यावरून गोंधळ झाला होता. सोनिया गांधी यांनी याच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली होती. तोच धागा पकडून फडणवीस यांनी टीका केली.

हा तर दिमागी नक्षलवाद

काँग्रेसच्या कार्यक्रमावेळी झालेल्या गोंधळावर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांच्या डोक्यात अराजकता आहे ती दिसत आहे. काँग्रेस कार्यक्रमात आजच ती दिसली. वंदे मातरम् बाबत आदेशात संपूर्ण वंदे मातरम् म्हणायचं आहे असं सांगितलं आहे. तरीही पूर्ण वंदे मातरम् वाजले म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हा दिमागी नक्षलवाद आहे.

येडा बनून पेढा खाऊ नका

देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांकडे महिला आरक्षणासाठी पाठिंबा मागितला आहे. त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं की, पंतप्रधानांनी सर्व पक्षांकडे पाठिंबा मागितला आहे. तरी त्याच्यावर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. पहिल्या विधेयकात दोन अटी होत्या. जनगणना पूर्ण करा नंतर डिलिमिटेशन करा. पण जनगणना वेळेत पूर्ण नसल्याने डिलिमिटेशन विधेयक थांबले. गेल्यावेळी ते विधेयक पडले.'

त्यांनी, जनगणना पूर्ण करून ते विधेयक मंजूर करता आले असते. त्या विधेयकातील दोन अटी पूर्ण केल्याशिवाय महिलांना आरक्षण देता येणार नाही. बोली भाषेत येडा बनून पेढा खाऊ नका. तुम्ही पाठिंबा द्या तरच महिलांना २०२९ मध्ये आरक्षण मिळणार आहे असं विरोधकांना सुनावलं.

राहुल गांधींच्या अनुपस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, राहुल गांधी अनुपस्थित राहणे हे दुर्दैवी आहे. राहुल गांधी आणि खरगे यांचा भाजपला विरोध आहे. त्यांनी भारताला विरोध करू नये. हा पक्षाचा नाही तर भारताचा सोहळा आहे. याला दोन्ही विरोधी पक्षनेते उपस्थित रहायला हवे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT