Devendra Fadnavis : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला रेकॉर्डब्रेक तिरंगा रॅली
Devendra Fadnavis Marathwada
Devendra Fadnavispudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : समुद्रात वाहून जाणारे कोकणचे पाणी गोदावरीच्‍या खोऱ्यात आणायचे, कोल्हापूर, सांगलीचे पाणी उजनीतून मराठवाड्यात आणून हा विभाग सुजलाम् सुफलाम् करणार आहे. मराठवाड्याच्या आजपर्यंतच्या पिढीने दुष्काळ पाहिला आहे. परंतु, आता पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. १४) स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित रेकॉर्डब्रेक तिरंगा रॅलीच्या समारोपावेळी दिली.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन, विधान सभेचे सभापती राम शिंदे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ओबीसी मंत्री अतुल सावे, रोहयो व पणन मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, स्मिता वाघ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील संभाजीपेठपासून क्रांती चौकापर्यंत काढण्यात आलेल्‍या तिरंगा रॅलीत हजारोंच्‍या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Devendra Fadnavis Marathwada
Maharashtra Industrial Growth: महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नंबर वन आहे अन्‌ कायम राहील; मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

यात्रेच्‍या समारोप प्रसंगी बोलतांना, ते म्हणाले की, देश १५ ऑगस्ट १९४७ स्वतंत्र झाला असले तरी मराठवाडा हा निझामाच्या जुलमी राजवटीतून १३ महिन्यांनंतर मुक्त झाला. परंतु, आता मराठवाड्याला दुष्काळातून मुक्त करण्यात येणार आहे. आतापर्यंत मराठवाड्याच्या पिढीने दुष्काळ अनुभवला आणि पाहिला आहे. परंतु, पुढच्या पुढीला दुष्काळ पाहू देणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यासाठी आम्ही कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणायचे आणि सांगली, कोल्हापूरचे पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्यात आणयचे, या मराठवाड्याला सुजलाम्, सुफलाम् करणार आहोत.

अधिकरासोबतच कर्तव्यही लक्षात ठेवा

आजच्या दिवस हा खऱ्या आर्थाने सिंहावलोकनाचा दिवस आहे. जगातील सर्वोत्तम संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्रदिनी भारताला दिले आहे. या संविधानानेच प्रत्येकांला मूलभूत अधिकार दिले आणि ते टिकवून ठेवले आहे. परंतु, या अधिकारासोबतच प्रत्येकाला मूलभूत कर्तव्य देखील दिले आहेत. त्यामुळे जो मूलभूत कर्तव्य करेल, त्यालाच मूलभूत अधिकाराचा हक्का असतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis Marathwada
Shravan Wild Vegetables: श्रावणातील रानभाज्यांची पुणेकरांना भुरळ; करटुली, हादग्याच्या फुलांना चांगला भाव

महाराष्ट्राची अर्थव्यसव्था ५० कोटींवर

महाराष्ट्राची आर्थव्यवस्था २०१३-१४ साली केवळ १२-१३ लाख कोटी एवढीच होती. मात्र, गेल्या दहा ते बारा वर्षात ही अर्थव्यवस्था उंच नेण्यासाठी सतत प्रयत्न केले, आणि आज राज्याची अर्थव्यवस्था ही ५० लाख कोटींवर नेली आहे. देश नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात बदलतोय. दहा वर्षांतील २५ कोटी जनतेला दारिद्रयरेषेवर आणण्यात यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news