CM Fadnavis on Delimitation Bill: "केंद्र सरकारने २०२३ मध्ये महिला आरक्षणासाठी 'नारी शक्ती वंदन विधेयक' मांडले गेले, तेव्हा त्यात स्पष्ट नमूद होते की, महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघांचे पुनर्रचना (Delimitation) करावे लागेल. जागांची संख्या वाढवावी लागेल. त्यावेळी कोणीही याला विरोध केला नव्हता. त्यांनी तेव्हा पाठिंबा दिला होता, तर आज का विरोध करत आहेत?," असा सवाल करत मतदारसंघ पुनर्रचना विधयकाबरोबरच महिलांना संसदीय राजकारणात आरक्षण प्रत्यक्षात लागू होणार आहे. त्यामुळेच आज 'डिलिमिटेशन'ला विरोध करणारे लबाड आहेत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
'एएनआय'शी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली. , ही विरोधकांची "राजकीय हाराकिरी असल्याचेही त्यांनी म्हटले.
"२०२३ मध्ये जेव्हा महिला आरक्षणासाठी 'नारी शक्ती वंदन' विधेयक मांडण्यात आले होते, तेव्हाच त्यात स्पष्ट नमूद केले होते की, महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागेल. जागांची संख्या वाढवावी लागेल. त्यावेळी कोणीही याला विरोध केला नव्हता. त्यावेळी त्यांनी याला पाठिंबा दिला होता, तर आज ते पाठिंबा का देत नाहीत?", असा सवालही फडणवीसांनी केला.
"आज विरोधक विधेयकाला पाठिंबा देत नाहीत, कारण त्यावेळी त्यांना असे वाटले होते की हे विधेयक फक्त मंजूर होईल, पण महिला आरक्षण प्रत्यक्षात लागू होणार नाही. मात्र, आज जेव्हा त्यांना हे लक्षात आले आहे की, महिला आरक्षण प्रत्यक्षात आणले जात आहे. त्यासाठी त्यांनीच मंजूर केलेल्या पुनर्रचना विधेयकाला मान्यता दिली जात आहे, तेव्हा त्यांनी याला विरोध सुरू केला आहे. त्यांचा हा विरोध मतदारसंघ पुनर्रचनेविरुद्ध नसून, यातून त्यांची महिलाविरोधी मानसिकता दिसून येते," असा आरोपही फडणवीसांनी केला.