मुंबई : पुढारी वृत्तसेवा : इन्टाग्राम खात्यावर महिलेच्या अश्लिल फोटोवर वरळीतील एका काॅलेज तरुणाचा चेहरा लावुन फोटो व्हायरल करत बदनामी केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळीतील कस्तुरबा गांधी नगरमध्ये रहात असलेला जयेश हा (वय 22) नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. सोबतच तो गिरगावातील एका काॅलेजमध्ये ११ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. ०२ डिसेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे काॅलेजमध्ये आल्यानंतर त्याच्या दोन मित्रांनी इन्स्टाग्रामवरील एका खात्यावर जयेशचा चेहरा एका अश्लिल अवस्थेतील महिलेला लावलेला फोटो दाखविला.
१२ नोव्हेंबर रोजी त्या इन्स्टाग्राम खात्यावर हे फोटो पोस्ट करण्यात आले होते. यानंतर जयेश हादरुन गेला. कोणतरी आपली बदनामी करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याची खात्री पटल्याने अखेर त्याने तक्रार दिली.
.हेही वाचा