प्रातिनिधीक छायाचित्र pudhari File Photo
मुंबई

Dahisar Murder Attempt: मैत्रिणीवरून झालेल्या वादातून मित्रावर तलवारी-चाकूने हल्ला; तीन महिन्यांनंतर आरोपी अटकेत

दहिसर पोलिसांची कारवाई; सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला करून आरोपी फरार होता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून आरिफ रुकमउद्दीन शेख या 32 वर्षांच्या सुरक्षा रक्षकावर चाकूसह तलवारीने प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या एका आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. विकास ऊर्फ विकी राजू निनानिया असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होता.तो गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता.

आरिफ शेख हा बोरिवली येथे राहत असून एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सनी सालेकर हा त्याचा मित्र आहे. तो त्याच्या मैत्रिणीशी बोलत असल्याने त्यांच्यात याच मैत्रिणीवरुन वाद झाले होते. या वादानंतर त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. 6 डिसेंबर 2025 रोजी आरिफ हा त्याच्या मित्रांसोबत दहिसर येथील आनंदनगर, स्वामी नारायण मंदिराजवळील ब्रिजजवळ होता. याच दरम्यान तिथे सनी

हा त्याच्या सात ते आठ मित्रांसोबत आला. या सर्वांनी आरिफवर चाकूसह तलवारीने वार केले. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला आधी शताब्दी व नंतर कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी आरिफच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT