16 अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी आतापर्यंत 4 लाख 77 हजार अर्ज Pudhari
मुंबई

CET registration : 16 अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी आतापर्यंत 4 लाख 77 हजार अर्ज

दोन वेळा परीक्षा पर्याय देण्याकडेही कल वाढला; एमएचटी सीईटीच्या दोन्ही गटांसाठी सर्वाधिक अर्ज

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असून, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण व वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या एकूण 16 अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत एकूण 4 लाख 77 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

यामध्ये 3 लाख 88 हजार 526 उमेदवारांनी शुल्क भरून नोंदणी निश्चित केली आहे, तर 89 हजार 425 अर्ज नोंदणी प्रक्रियेत आहेत. काही प्रमुख अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे 3 लाखांवर अर्जसंख्या पोहचली आहे.

सीईटी सेलने यंदा 5 जानेवारीपासून अर्ज नोंदणीला सुरुवात केली आहे. टप्याटप्याने सर्व 16 अभ्यासक्रमांची नोंदणी सुरु केल्यानंतर आता काही अभ्यासक्रमांना मुदतवाढही देण्यात आली आहे. एमएचटी सीईटीच्या दोन्ही गटासाठी आतापर्यंत सर्वाधिक 2 लाख हजार 128 उमेदवारांनी नोंदणी निश्चित केली असून, 46 हजार 376 अर्ज प्रक्रियेत आहेत.

या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2026 असून, परीक्षा 11 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. यापैकी पीसीएम गटासाठी 1 लाख 57 हजार अर्ज आले आहेत. तर पीसीबी सीईटीसाठी 81 हजार उमेदवारांनी नोंदणी निश्चित केली असून, 11 हजार 672 अर्ज प्रक्रियेत आहेत. या सीईटीसाठी नोंदणीची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी 2026, तर परीक्षा 21 एप्रिल 2026 रोजी नियोजित आहे.

एमबीए / एमएमएस सीईटीसाठी 23 हजार 962 उमेदवारांनी शुल्क भरून नोंदणी निश्चित केली असून, 11 हजार 8 अर्ज अद्याप प्रक्रियेत आहेत. या सीईटीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2026, तर परीक्षा 6 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी 46 हजार 477 उमेदवारांनी नोंदणी निश्चित केली असून, 6 हजार 918 अर्ज प्रक्रियेत आहेत.

या सीईटीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2026 आहे. तर पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी 19 हजार 797 उमेदवारांनी नोंदणी निश्चित केली असून, 2 हजार 612 अर्ज प्रक्रियेत आहेत. या अभ्यासक्रमासाठी नोंदणीची अंतिम मुदत 14 फेब्रुवारी 2026 आहे.

बी.एड. (सामान्य व विशेष) तसेच चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रमासाठी 70 हजार 840 उमेदवारांनी नोंदणी निश्चित केली आहे. याशिवाय एम.एड.साठी 2 हजार 170, एम.पी.एड.साठी 1 हजार 595, तर बी.पी.एड.साठी 1 हजार 219 उमेदवारांनी नोंदणी पूर्ण केली आहे. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा मार्च ते एप्रिलदरम्यान होणार आहेत

  • यंदाच्या सीईटी प्रक्रियेतील महत्त्वाचा बदल म्हणजे दोन वेळा सीईटी परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला असून 1 लाख 59 हजार 681 उमेदवारांनी दोन्ही प्रयत्नांसाठी नोंदणी केली आहे, तर 1 लाख 3 हजार 64 उमेदवारांनी एकदाच परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे. तसेच सीईटी नोंदणीत आतापर्यंत 22 तृतीयपंथी उमेदवारांनी, 1 हजार 288 अनाथ उमेदवारांनी तसेच 12 हजार 704 दिव्यांग उमेदवारांनी नोंदणी निश्चित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT