Churchgate station Rat Video pudhari
मुंबई

Churchgate station Rat Video: चर्चगेट स्थानकातील चहाच्या स्टॉलमध्ये उंदीर आढळल्याचा Video; पश्चिम रेल्वेची कारणे दाखवा नोटीस

चर्चगेट स्थानकातील ओरिजिन चहाच्या स्टॉलमध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Anirudha Sankpal

Churchgate station Tea Stall Rat Video: चर्चगेट स्थानकातील ओरिजिन चहाच्या स्टॉलमध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशाने २६ सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पश्चिम रेल्वेन याची तात्काळ दखल घेत त्याच दिवशी या स्टॉलची तपासणी केली होती. तपसाणीत स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबाबत अनेक त्रुटी आढळल्या आहेत.

प्रशासनाच्या तपासणीत विक्रेता एमडी कसाब याचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. तसेच चटणीचे डबे झाकणाविना ठेवण्यात आल्याचे देखील निदर्शनास आलं. प्लॅटफॉर्मवर तेल आणि चटणी सांडलेली दिसली. शिवलेले खाद्यपदार्थ आणि वड्याचे मिश्रण हे उघड्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली होते.

याचबरोबर कोपीचे साल उघड्यावर पडले होते. धुण्याचे बेसीन अस्वच्छ होते. कीटन नियंत्रण, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या तपासणीत नमूद करण्यात आलं आहे.

याप्रकरणी आता प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून दोन दिवसात यावर लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंत्राटदाराला परवाना रद्द दिंवा कंत्राट रद्द करण्याची कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून म्हणजे २६ सप्टेंबर पासून संबंधित स्टॉल हा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT