Chembur MHADA Pudhari
मुंबई

Chembur MHADA: चेंबूरमध्ये म्हाडा इमारतीवरून सहा कामगार कोसळले; एकाचा मृत्यू

सुभाष नगरमधील पुनर्विकास प्रकल्पात भीषण अपघात; सुरक्षा उपायांवर गंभीर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला : चेंबूरच्या सुभाष नगर विभागात म्हाडाच्या 36 क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास सुरु असून, या निर्माणाधीन इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जीव धोक्यात घालून काम करणारे सहा कामगार थेट खाली कोसळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत रामजेनेल्लु हनुमंता देशपोगु (55) हा कामगार जागीच ठार झाला. गुणाधर रॉय(22) याची तब्येत चिंताजनक असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. कूस रॉय (30), विजय कुमार

मेवालाल मोर्या (35), संदीप रॉय (27) आणि रमेश रॉय (25) हे जखमीही राजावाडी रुग्णालयात दाखल आहेत.

म्हाडाच्या या 36 क्रमांकाच्या इमारतीचे काम आदित्यराज बिल्डरला दिलेले आहे. मात्र बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा असून, कामगारांच्या सुरक्षेचे कोणतेही उपाय केलेले नाहीत.

अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करीत असतानाच हे कामगार शनिवारी सहाव्या मजल्यावरून पडले. या विभागात अनेक बांधकामे सुरु असून तिथेही निष्काळजीपणा असल्याने वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT