Mumbai Mega Block Pudhari
मुंबई

Central Railway Mega Block: मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक; अनेक लोकल गाड्या उशिराने धावणार, काही रद्द

या दरम्यान काही गाड्या उशिरा तर काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर रविवारी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या दरम्यान काही गाड्या उशिरा तर काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. मेन लाईनवर हा ब्लॉक माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत असणार आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी सुटणाऱ्या 'डाऊन' जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथून 'डाऊन' धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहे.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या 'अप' जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर 'अप' धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

- हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे 'डाऊन' हार्बर लाईन सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 'अप' हार्बर लाईन सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

तसेच सीएसएमटी येथून ब्लॉक काळात सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या गाड्या आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन आणि अप हार्बर लाईनवरील गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

तसेच पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहिम स्थानकांदरम्यान रेल्वेमार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवार (१ ऑगस्ट) आणि रविवार (२ ऑगस्ट)च्या मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हा ब्लॉक रात्री १२.२५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर (फास्ट लाईन) राहील. या कालावधीत सर्व फास्ट लोकल गाड्या चर्चगेट ते सांताक्रूझ दरम्यान धीम्या मार्गावर (स्लो लाईन) धावतील.

मात्र, रविवार, २ ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक असणार नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. प्रवाशांनी या तात्पुरत्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT