Purandar International Airport: पुरंदर विमानतळासाठी मोठा निर्णय; ६ हजार कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील

दरम्यान, यावेळी पुरंदर विमानतळाच्या कामांसाठी हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली.
Purandar International Airport
Purandar International AirportPudhari
Published on
Updated on

मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)ने पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळा-२०२७ पूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, यावेळी पुरंदर विमानतळाच्या कामांसाठी हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली.

Purandar International Airport
TET Teacher Promotion Rules: टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना मोठा दिलासा; पदोन्नतीच्या नियमांमध्ये सरकारकडून महत्त्वाचा बदल

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची ९३ वी बैठक मंत्रालयात झाली. बैठकीस एमएडीसीचे कार्यकारी संचालक दीपक कपूर, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, आयुक्त विपिन इटनकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Purandar International Airport
B Pharmacy Admission 2026: बीफार्मसी, फार्मडी प्रवेश प्रक्रिया सुरू!

फडणवीस म्हणाले, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कंपनीमध्ये एमएडीसीसोबत सिडको, एमआयडीसी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा सहभाग असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news