Mumbai Water Cut: मुंबईकर पाणीटंचाईने बेजार! तलाव तुडुंब भरले तरी अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबईकर अक्षरश: त्रस्त असून अनेकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
Mumbai Water Cut
Mumbai Water CutPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तुडुंब भरले असले तरी, शहरात पाणीकपात सुरूच आहे. त्यामुळे सुमारे दीड कोटी मुंबईकर बेजार झाले आहेत. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक भागात पाणीच मिळत नसून काही भागात जेमतेम पाणी मिळत असल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे.

मुंबईत अजूनही २० टक्के पाणीकपात लागू असून अनेक निर्बंधही लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना जेमतेम दररोज ३ हजार दशलक्ष लिटर्सपेक्षा कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मुंबईकर अक्षरश: त्रस्त असून अनेकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

Mumbai Water Cut
Purandar International Airport: पुरंदर विमानतळासाठी मोठा निर्णय; ६ हजार कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील

याबाबत स्थायी समितीत नगरसेवकांनी पाणीकपात रद्द करण्याबाबतही प्रश्न उपस्थित केला होता. मात्र सर्व तलाव भरेपर्यंत पाणीकपात रद्द केली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

परंतु मुंबईकर पाणीटंचाईने त्रस्त असल्यामुळे त्यांना समजावायचे कसे असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. चार तलाव ओसंडून वाहू लागले असून अन्य महत्त्वाचे तलावही जवळपास भरत आले आहेत.

शहरात सुरू असलेली २० टक्के पाणी कपात व विविध कामांसाठी अधूनमधून करण्यात येणारी १५ ते २० टक्के कपात यामुळे पाणीटंचाईचा मोठा फटका मुंबईकरांना बसत आहे. अगोदरच ५०० दशलक्ष लीटरपेक्षा पाण्याची कमतरता असताना, यात अजून १ हजार दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाण्याची कपात करण्यात आल्यामुळे मुंबईकर गेल्या दोन महिन्यापासून हैराण झाले आहेत.

या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका झोपडपट्टी व उंचावर राहणाऱ्या भागाला बसत आहे. अनेकदा पाणीच येत नसल्यामुळे १२०० ते १५०० रुपये मोजून टॅंकरचे पाणी मागवावे लागत आहे.

Mumbai Water Cut
B Pharmacy Admission 2026: बीफार्मसी, फार्मडी प्रवेश प्रक्रिया सुरू!

झोपडपट्टी व चाळीमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना टँकरही आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. त्यामुळे सध्या तलावात मुबलक पाणीसाठा असूनही मुंबईकर पाण्यासाठी तळमळत असताना दिसून येत आहे.

या भागात पाणीटंचाई

शहर: वरळी, लोअर परेल, शिवडी, परळ, नायगाव, मुंबई सेंट्रल भायखळा, काळाचौकी, धारावी, सायन, वडाळा

पश्चिम उपनगर: बांद्रा, कलीना, खार, विलेपार्ले, अंधेरी, मरोळ, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड, मालवणी, गोराई, दहिसर

पूर्व उपनगर: चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, कुर्ला, घाटकोपर, कांजुर, भांडुप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news