Central Railway Special Trains file photo
मुंबई

Diwali Special Trains: पूजा, दिवाळीसह छठ उत्सवासाठी ४१८ विशेष गाड्या

मध्य रेल्वेकडून घोषणा; साप्ताहिक विशेष गाड्या नोव्हेंबरपर्यंत; नागरिकांचा प्रवास होणार सुखद

पुढारी वृत्तसेवा

रोहे: मध्य रेल्वेने आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ठिकाणांदरम्यान ४१८ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम नॉर्थ लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (१२ सेवा) आहे.

गाडी क्रमांक ०१४६३ ही साप्ताहिक विशेष गाडी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी ४ वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम नॉर्थ येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस मडगांव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (१४ सेवा)गाडी क्रमांक ०११७९, ही साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता सुटेल.

ही गाडी ९ ऑक्टोबर आणि १६ ऑक्टोबर रोजी (पावसाळी वेळापत्रकानुसार) त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता, तर २३ सप्टेंबर ते २० नोव्हेबर या कालावधीत (पावसाळ्योत्तर /सामान्य वेळापत्रकानुसार) रात्री ८.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११८० ही साप्ताहिक विशेष गाडी मडगांव येथून २३ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत (पावसाळ्योत्तर /सामान्य वेळापत्रकानुसार) दर शुक्रवारी रात्री १० वाजता आणि ९ ऑक्टोबर व १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, थिवि आणि करमळी हे थांबे दिले आहेत.

यासह मध्य रेल्वेद्वारे पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई गोरखपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दैनंदिन विशेष गाड्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चेन्नई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक वातानुकूलित विशेष.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई श्री एम. विश्वेश्वरैया टर्मिनल बेंगळुरू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लातूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई द्वि-साप्ताहिक विशेष गाडीसह आदी गाड्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT