Mumbai Chowpatty : खमंग भेलपुरी खाण्यासाठी मुंबईतील चौपाट्या खुणावताहेत  File Photo
मुंबई

Mumbai Chowpatty : मायानगरी मुंबईची पर्यटकांना भुरळ, खमंग भेलपुरी-चाट खाण्यासाठी चौपाट्यांवर गर्दी, नॅशनल पार्क, चित्रनगरीसह पर्यटनस्‍थळांना पसंती

नॅशनल पार्कसह छोटा काश्मीरलाही पर्यटकांची पसंती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

मुंबईला नरिमन पॉईंट ते बोरिवलीपर्यंत मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्यालगत मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, बँड स्टैंड, जुहू चौपाटी, वर्सोवा बीच, आक्सा बीच, दाना पानी बीच अशा अनेक प्रसिद्ध चौपाटी आहेत. जुहू चौपाटीची भेलपुरी, चाट पर्यटकांचे आवडते खाद्य आहे.

घोडागाडी, उंटांवरून फेरफटका मारण्यासह किनाऱ्यालगत विविध खाद्यपदार्थांवर ताव मारणारे पर्यटक दिसून येतात. जुहू चौपाटीला भेट दिल्यानंतर येथील इस्कॉनच्या हरे राम हरे कृष्ण मंदिराला पर्यटक आवर्जून भेट देतात. येथून काही अंतरावर असलेल्या बिग बी अमिताभ बच्चनचे घर पाहण्याचा मोहही पर्यटकांना टाळता येत नाही.

सफर नॅशनल पार्कची

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) पर्यटकांचे आवडते आहे. हे जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान शहरात आहे. १०३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या राष्ट्रीय उद्यानाला दरवर्षी २० लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. येथील जंगल सफारी साठी बसचीही व्यवस्था आहे. तर मिनी ट्रेन मधून जंगलचा फेरफटकाही मारू शकता.

जुद्द चौपाटीच्या रेतीवर धावणाऱ्या ग्लोबल विपश्यना पॅगोडा गोराई बेटाच्या हिरव्यागार आणि शांत वातावरणात वसलेले ग्लोबल विपश्यना ध्यान पॅगोडा हे मुंबईतील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. घुमट म्यानमारच्या वेडेंगॉन पॅगोडासारखा आहे. हा जगातील सर्वात मोठा दगडी घुमट असून तो कोणत्याही आधाराशिवाय उभा आहे. एका वेळी ८ हजार लोक ध्यानासाठी बसू शकतात.

पवई तलाव

१८९१ मध्ये मिठी नदीवर बांधलेल्या दोन धरणांमुळे पवई तलाव तयार झाला. या तलावाचे सुशोभीकरण मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. सभोवतालचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. येथील फुलपाखरे पर्यटकांना आकर्षित करतात. येथे किंगफिशर, स्पॉटबिल्ड बदक दिसतात. सारस, बगळेही पाहू शकता.

महाकाली लेणी

अंधेरी रेल्वे स्टेशन पूर्व येथून ६ कि. मी. अंतरावरील लहान टेकडीवर ही लेणी कोरलेली आहे.

कन्हेरी लेणी

पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्टेशनपासून पूर्वेकडे ९-१० कि.मी. वर असलेल्या विस्तीर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कन्हेरी लेणी आहेत.

मुंबई चित्रनगरी

भारतीय चित्रपट उद्योग जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. भारतात निर्मित चित्रपटांपैकी ६० टक्के वाटा मुंबईतील या चित्रनगरीचा आहे.

छोटा काश्मीर

आरे कॉलनी मध्ये छोटा कश्मीर नावाचे भव्य उद्यान आहे. त-हेत-हेचे रंगबेरंगी फुलझाडे मऊशार हिरवळ, नारळीचे व इतर हिरवेगार वृक्ष आहेत.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, विलेपार्ले व सांताक्रुझ स्टेशन येथे उतरून बेस्ट बस-टॅक्सी-रिक्षा व ओलाने जुहूला जाता येते. अंधेरी स्टेशन जंक्शन असल्याने येथून चौपाटीसाठी अनेक बस व रिक्षाही आहेत.

बोरिवली रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर बोरिवली पूर्वेकडून चालत १५ ते २० मिनिटात नॅशनल पार्कच्या मुख्य गेटपर्यंत येऊ शकता.

बोरिवली स्टेशनवरून पश्चिमेला बस-ऑटोने गोराईपर्यंत येऊ शकता. पुढे खाडी क्रॉस करून पॅगोडापर्यंत पोहचू शकता.

कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन पश्चिम व अंधेरी रेल्वे स्टेशन पूर्व येथून बसने तलावाला भेट देऊ शकता. ऑटो व खासगी गाड्यानेही येथे येऊ शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT