BMC Mayor Reservation: राज्यातील २९ महापालिका महापौर पदाची सोडत आज (दि. २२ जानेवारी) मुंबईत जाहीर झाली. यावेळी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आपला महापौर बसवण्याचे स्वप्न भंगलं आहे.
दरम्यान, ही सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गोटातील पाच नावे सध्या महापौरपदासाठी आघाडीवर आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 132 घाटकोपरमधून निवडून आलेल्या रितू तावडे, माजी उपमहापौर अलका केरकर आणि तेजस्वी घोसाळकर यांची नावे आघाडीवर आहेत. त्याचबरोबर राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर यांची नावे देखील चर्चेत आहेत.
वय : 53 वर्ष
शिक्षण : 12 वी
रितू तावडे या मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक १३२ घाटकोपरमधून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे त्या ज्या मतदार संघातून निडवून आल्या आहेत तो गुजराती बहुल मतरादरसंघ आहे. मराठा समाजातून येणाऱ्या रितू तावडे या युवा महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. रितू तावडेंची ही नगरसेवकपदाची दुसरी टर्म असून महापौरपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर आहे.
शिक्षण : BSc (मुंबई विद्यापीठ)
अलका केरकर या भाजपच्या अनुभवी नगरसेविका असून त्या वॉर्ड क्रमांक 98 मधून निवडून येतात. या प्रभागात वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पश्चिम हा परिसर येतो. त्यांची लढत ही नवख्या स्वप्ना म्हात्रे हेतल गाला आणि माजी नगरसेविका राजा खान यांच्याशी होती. केरकर यांची नगरसेवकपदाची ही चौथी टर्म असून असून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्यांना ओळखले जाते.
वय- 38
शिक्षण- Bachelor in Computer Science (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ)
मुंबई महापालिका निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर हे नाव राज्यभरात चर्चेत होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या शिवसेनेचे दिवंगत पदाधिकारी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असून विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत.
त्यांच्या शिवसेना सोडण्याच्या निर्णयावरून मोठा गदारोळ झाला होता. कुटुंबियांनी देखील या पक्षप्रवेशाबाबत नाराजी होती. मात्र त्या दहीसर 2 मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा 10, 755 मतांनी पराभव केला होता.
वय- 47 वर्ष
शिक्षण- Bachelor in Fine Art (Applied Arts- J J Institute, Mumbai)
भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी प्रभाग क्रमांक 172 सायन माटुंगा भागातून विजय मिळवला आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होता. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पराभवाचा मोठा धक्का दिला होता.
राजश्री शिरवाडकर यांनी 2017 ला झालेल्या निवडणुकीत याच प्रभागातून विजय मिळवला होता. त्यांना त्यावेळी 13 हजार 731 मते मिळाली होती. शिरवाडकर यांची देखील नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे.
वय- 44
शिक्षण- Bachelor in Commerce (मुंबई विद्यापीठ)
मुंबईतील हाय व्होल्टेज लढतीपैकी एक लढत म्हणजे वॉर्ड क्रमांक 190 मधील शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली पाटील आणि भाजपच्या शीतल गंभीर यांच्यातील लढत. शीतल गंभीर यांनी अवघ्या 125 मतांनी ही निवडणूक जिंकली होती. इथं पुनर्मोजणीदेखील झाली होती.
आदित्य ठाकरेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेतून आदित्य ठाकरेंवर टीका करतानाा 'त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शीतल गंभीर पुरेशा आहेत', असं म्हटले होते.