मुंबई

BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेच्‍या निकालावर मंत्री नितेश राणे खळखळून हसले, दोन शब्‍दांत विषय संपवला!

सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्मवर 'एक्‍स'वर शेअर केला व्‍हिडिओ

पुढारी वृत्तसेवा

Nitesh Rane on BMC Election Result 2026

मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आता स्‍पष्‍ट होत आहेत. या निवडणुकीत भाजपने निर्विवाद आघाडी घेतली आहे. यानंतर मंत्री नितेश राणे यांनी आपल्या नेहमीचा शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. खळखळून हसणारा व्‍हिडिओ आणि दोन शब्दांत दिलेल्‍या प्रतिक्रियेचा व्‍हिडिओ त्‍यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओ?

नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते काहीही न बोलता केवळ खळखळून हसताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्‍या पराभवानंतर त्‍यांनी उपरोधिक हास्‍याचा व्‍हिडिओ शेअर केला आहे.

दोन शब्दांत बोचरी टीका

खळखळून हसत असलेल्‍या स्‍वत:चा व्हिडिओ शेअर करत नितेश राणे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे उद्धवजी आणि पेंग्विनला असे लिहिलं आहे. त्यांनी केवळ दोन शब्द वापरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेत महायुती बहुमताच्या दिशेने

मुंबई महापालिका निवडणुकीत 227 पैकी 195 जागांवरील कल हाती आले आहेत. यात भाजप 87 तर शिंदेंची शिवसेना 25 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना 28, तर मनसे 8 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस 10 तर इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT