मुंबई : बीकेसी-वाकोला जोडमार्गाचे अंतिम संरचनात्मक काम पूर्ण झाले असून या मार्गाची एकूण लांबी सुमारे 1.4 किमी आहे. यात 500 मीटरचे 4-पदरी उन्नत मार्ग व 900 मीटरचे 2-पदरी जोडमार्ग आहेत. pudhari photo
मुंबई

BKC Vakola connector road : बीकेसी ते वाकोला जोडमार्ग पूर्णत्वास

10.88 किमी लांबीचा सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पोहोचला अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील सर्वांत महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम दळणवळण मार्गांपैकी एक असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दिशेने एमएमआरडीएने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. बीकेसी ते वाकोला जोडमार्गाचे अंतिम प्रमुख संरचनात्मक काम पूर्ण झाले असून यामुळे संपूर्ण 10.88 किमी लांबीचा एससीएलआर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

वाकोला नाल्यावर असलेल्या पुलावर पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर 54 मीटर लांबीचे दुहेरी कॉम्पोझिट गर्डर्स यशस्वीरित्या उभारल्यानंतर भारत डायमंड बोर्स ते वाकोला दरम्यानचा शेवटचा महत्त्वाचा दुवा संरचनात्मकदृष्ट्या पूर्ण झाला आहे. हा भाग तुलनेने लहान असला तरी विविध उड्डाणपूल, जोडमार्ग आणि संरचनांना एकत्रित जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे संपूर्ण एससीएलआर नेटवर्क कार्यान्वित होण्यास मदत होईल.

उभारण्यात आलेला स्पॅन 54 मीटर लांब आणि 8.5 मीटर रूंद आहे. त्याचे अंदाजे वजन 358 मेट्रिक टन असून यात तीन समांतर गर्डर्स आहेत. गर्डरची खोली 3.130 मीटर आहे. हे गर्डर्स पूर्ण-स्पॅन लॉन्चिंग पद्धतीद्वारे उभारले असून यासाठी 700 मेट्रिक टन आणि 500 मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेन्सचा वापर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT