Online Betting: ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाळ्यात ग्रामीण भागातील तरुणांचाही ओढा

आयपीएल जसे खेळासाठी चर्चेत असते तसेच त्याची सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे येथे होणाऱ्या करोडो-अब्जो रुपयांच्या उलढालीची.
Online Betting
Online BettingPudhari
Published on
Updated on

ठाणे: आयपीएलची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आयपीएल सामने क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची पर्वणी घेऊन येतात. त्यामुळे आयपीएल सामन्यांची क्रिकेटप्रेमींमध्ये नेहमीच जोरदार चर्चा असते. आयपीएल जसे खेळासाठी चर्चेत असते तसेच त्याची सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे येथे होणाऱ्या करोडो-अब्जो रुपयांच्या उलढालीची.

खेळाडूंवर लागणाऱ्या कोट्यवधींच्या बोली, हजारो कोटींच्या ब्रॉडकास्ट राईट्स, हजारो करोडोंची स्पॉन्सरशिप आणि बरेच काही. मात्र, या साऱ्या जगासमोर असलेल्या हजारो कोरोडोंच्या उलाढालीपेक्षा जास्त खोऱ्याने पैसा खेचतात ते म्हणजे क्रिकेटवर जगभरातून सट्टा घेणारे बुकी.

Online Betting
Karjat Station: लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवा, अन्यथा रेल रोको; कर्जतकरांचा रेल्वे प्रशासनाला इशारा

सध्या संपूर्ण सट्टा बाजार ऑनलाइन झाल्याने प्रत्येक सामन्यावर आणि सामन्यातील प्रत्येक बॉलवर अवघ्या काही सेकंदात शेकडो कोटींचा डाव संपूर्ण जगभरातून खेळला जातोय. विशेष म्हणजे या ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाळ्यात ग्रामीण भागातील तरुण देखील मोठ्या प्रमाणात ओढले जात आहेत.

सध्या सुरू असलेल्या आयपीएल सीझनमध्ये दहा टीम मध्ये एकूण 70 सामने रंगणार असून प्रत्येक सामन्यावर जगभरातून 100 ते 600 कोटींच्या घरात सट्टा लावला जातोय. प्रत्येक संघावर एक भाव ठरवून त्याद्वारे हा सट्टा ऑनलाइन घेतला जातोय.

तर ऑफलाईन देखील बेटिंगचा बाजार गरम झाला असून साऱ्या सट्टा सिंडिकेटचा व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी बुकींची साखळी देशातल्या प्रत्येक राज्यात व राज्यातील प्रत्येक शहरात कार्यरत आहे. सध्याच्या आयपीएल काळात 28 हजार कोटी रुपयांची उलाढाल सट्टा बाजारात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा जास्त पैसा सट्टा बाजारात फिरतोय असा अंदाज मुंबईतल्या एका बुकीने व्यक्त केला.

आयपीएलचे सामने भारतात होत असून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमसह एकूण 12 शहरात आयपीएल मॅच खेळल्या जात आहेत. आयपीएल सिजनमध्ये शेकडो-हजारो कोटींच्या घरात उलाढाल होत असते. त्यातच पडद्याआडून हजारो कोटींची उलाढाल आयपीएल सामन्यावर होतेय. तो पडद्याआडील व्यवहार म्हणजे क्रिकेट बेटिंग अर्थात क्रिकेट सट्टा बाजार होय.

Online Betting
Gold Rates: सोने दरात घट ,तरीही खरेदीला अपेक्षित प्रतिसाद नाही; रायगडच्या सोने बाजारात शुकशुकाटच

उल्हासनगर शहरातील एका बुकीने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर अशी माहिती दिली की, सध्या होणाऱ्या प्रत्येक सामन्यावर मुंबईसह भारतातील मोठ्या महानगरातून 100 ते 600 कोटींच्या घरात सट्टा डाव लावला जातोय. तर सध्या बेटिंग पद्धती ऑनलाइन झाल्याने जगभरातून कमी कालावधीत बेटिंग स्वीकारणे सहज शक्य झालेय. त्यामुळे जगभरातून लागणाऱ्या बेटिंगचा पैसा हजारो कोटींच्या घरात आहे.

सामना सुरू असताना पुढील टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक चेंडूवर, ओव्हरवर, व्हीकेटवर बेटिंग लावण्याची सोय ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे अशा इन प्ले बेटिंगमुळे एका चेंडूवर अवघ्या काही मिनिटात शेकडो कोटींचा डाव लागतो. आयपीएलवर बेटिंग लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही वेबसाईट कंपन्यांना हक्क देण्यात आले आहेत. या कंपन्यांनी सर्व व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी भारतासह जगभरात महत्वाच्या ठिकाणी आपली बुकींची साखळी उभी केली आहे.

इन प्ले बेटिंगवर सर्वाधिक सट्टा

खेळ सुरू असताना पुढील चेंडूवर अथवा खेळाडूंवर ऑनलाइन बेटिंग लावण्याच्या पद्धतीस इन प्ले अथवा लाईव्ह बेटिंग असे म्हणतात. सध्या अशा इन प्ले बेटिंगला सर्वाधिक पसंती मिळतेय असे एका बुकीने सांगितले. इन प्ले बेटिंगसाठी बेटिंग स्वीकारणाऱ्या वेबसाईट कंपन्यांनी खास ऑप्शन दिले आहेत. त्यात मॅच विनर, पहिल्या डिलिवरीवर रन, प्रति ओव्हर रन, प्रति ओव्हर रन, नेक्स्ट मॅन आउट, हायस्ट ओपनिंग पार्टनरशिप, प्लेयर्स इनींग रन असे ऑप्शन देण्यात आले आहेत.सट्टेबाज कुठल्याही ऑप्शनला निवडून काही मिनिटे अगोदर त्यावर बेटिंग लावू शकतो.

टीमनिहाय भाव

सट्टा बाजारात आधुनिक तंत्रज्ञान आले असले तरी सट्टा घेण्याची पद्धती मात्र जुनीच आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या भाव पद्धतीनेच हा सट्टा स्वीकारला जातो. भाव म्हणजे एखाद्या टीमला दिलेली किंमत असते. त्या किमतीनुसार सट्टा लावणाऱ्यास पैसे दिले जातात.

बँकिंग सिस्टमवर बेटिंगचा परिणाम

एका रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी आयपीएलच्या काळात जवळपास 100 अरब डॉलर म्हणजेच 8.3 लाख करोड़ रुपयांपेक्षा जास्त अवैध बेटिंगचा व्यवहार होतो. त्यामुळे बँकांच्या आईटी इंफ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात दबाव वाढून त्याचा परिणाम ऑनलाइन पेमेंट सिस्टिमवर होतो.

हायटेक यंत्रणा

कधी काळी कागदावर लिहून अथवा फोनवर घेतला जाणारा सट्टा बाजार आता आधुनिक झाला आहे. कुठल्याही एका टीम अथवा खेळाडूंवर बेटिंग लावण्यापासून तर प्रत्येक चेंडूवर, हंपायर निर्णयावर देखील आता ऑनलाइन बेटिंग लावता येतो. त्यास इन प्ले अथवा लाईव्ह बेटिंग म्हणतात. तर बुकींची एक साखळी नेहमीच हॉटलाईनवरून सट्टा घेण्यास सज्ज असते. सध्या सुरू असलेल्या आयपीएलवर बेटिंग स्वीकारण्यासाठी मुंबई परिसरातील बुकींनी तब्बल अडीच हजाराहून अधिक टोल फ्री फोन लाईन सट्टा लावणाऱ्यांसाठी खुल्या केल्या आहेत. खासकरून हॉटेलमध्ये रूम घेऊन तेथून बुकिंचा हा सारा नेटवर्क काम करीत असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news