मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खा. नारायण राणे आदी 40 नेते प्रचार करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
मुंबईसाठी चार सरचिटणीसांची नियुक्ती
आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने काही महिन्यांपूर्वी आमदार अमित साटम यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड केली. तेव्हापासून मुंबई कार्यकारिणीच्या नियुक्तीची चर्चा आहे. मात्र, अद्याप त्यांची घोषणा होऊ शकली नाही. मात्र, आता मुंबईसाठी चार सरचिटणीसांची घोषणा करण्यात आली आहे. यात राजेश शिरवाडकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळकर यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.