BEST open deck buses Pudhari
मुंबई

BEST open deck buses: बेस्ट दहा ओपन डेक दुमजली बस विकत घेणार

बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने 1997 मध्ये पहिली विनावातानुकूलित छतरहित ( ओपन डेक ) दुमजली बस सुरू करून बेस्ट उत्पनाचा नवा स्रोत निर्माण केला होता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महसूल वाढीच्या दृष्टीने बेस्ट उपक्रम विविध स्रोतांचा विचार करीत आहे. त्याचाच भाग म्हणून छतरहित (ओपन डेक) दहा दुमजली बस विकत घेणार असल्याचे बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी येथे सांगितले.

कुलाबा बेस्ट भवन येथे मंगळवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने 1997 मध्ये पहिली विनावातानुकूलित छतरहित ( ओपन डेक ) दुमजली बस सुरू करून बेस्ट उत्पनाचा नवा स्रोत निर्माण केला होता.

या बसमधून पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या जात होत्या. पुढे 3 नोव्हेंबर 2021 पासून दक्षिण मुंबईतही अशीच बस सुरू करण्यात आली. गेट ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, मंत्रालय, विधानभवन हुतात्मा चौक पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बेस्टला चांगले उत्पन्न मिळाले.

प्रत्येक महिन्याला जवळपास 20 ते 25 हजार पर्यटक या सेवेचा आनंद घेत होते. मात्र 5 सप्टेंबर, 2023 पासून ही सेवा बंद करण्यात आली आहे.

  • ओपन डेक बस विकत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्याचे टेंडरिंग होऊन या बसेस बेस्टच्या ताफ्यात असणार आहेत. शिवाय शैक्षणिक सहल,वाढदिवस, लग्न सोहळे यांना भाडेतत्वावर देऊन उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT