Maharashtra nursing CET exam: नर्सिंग सीईटीला आजपासून सुरुवात; 115 केंद्रांवर 47 हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

नर्सिंग क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम असल्याचे चित्र यंदाही दिसून येत आहे.
Nurse
NursePudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यातील नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी सीईटी परीक्षा बुधवारपासून (6 मे) सुरू होत असून, दोन दिवस चालणाऱ्या या परीक्षेसाठी यंदा तब्बल 47 हजार 722 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बीएस्सी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या अभ्यासक्रमांसाठीची ही परीक्षा 6 आणि 7 मे रोजी राज्यभर पार पडणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षामार्फत ही परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेतली जात असून, राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकूण 115 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. नर्सिंग क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम असल्याचे चित्र यंदाही दिसून येत आहे.

Nurse
Ajanta Tourism: अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

विशेष म्हणजे, यंदाच्या परीक्षेत 1 तृतीयपंथी, 259 अनाथ आणि 110 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. गेल्या वर्षी 47 हजार 501 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर यंदा त्यात किंचित वाढ झाली आहे.

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रांवर आवश्यक सोयी-सुविधा आणि सुरक्षेची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Nurse
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची भाकरी अडीच वर्षांनी फिरणार

वर्षनिहाय सीईटी विद्यार्थी नोंदणी

2023-24: 31,397

2024-25: 58,663

2025-26: 47,501

2026-27: 47,722

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news