BEST Electric Buses Pudhari
मुंबई

BEST Electric Buses: सलग दोन दिवस धावणार चार्जिंग बस; बेस्टच्या ताफ्यात २५ नवीन 'ब्लेड बॅटरी' बसेस दाखल होणार

ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडून ऑक्टोबरअखेर बसेसचा पुरवठा; कमी वजनाच्या बॅटरीमुळे ऊर्जा क्षमता वाढण्याची आणि देखभाल खर्च कमी होण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्ट परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात २५ नवीन 'ब्लेड बॅटरी' तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीकडून ऑक्टोबर अखेरपर्यंत या बसेस पुरवल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे एका चार्जिंगनंतर सलग २ दिवसांपर्यंत बस धावू शकतात अशा गाड्या बेस्ट घेणार आहे. या बसमुळे बेस्टचा ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावा म्हणून या नवीन ब्लेड बॅटरी इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहेत. पारंपारिक बॅटरीच्या तुलनेत या ब्लेड बॅटऱ्या अतिशय सुटसुटीत आणि ३० टक्के हलक्या असतात.

त्या बसच्या चेसिसमध्येच असल्याने त्या ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा व्यापतात, ज्यामुळे बसमध्ये जास्त जागा उपलब्ध होते.

ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान हे जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते. त्यामुळे प्रतिकूल हवामानात किंवा अपघातात बॅटरीचे नुकसान झाले, यात उष्णता खूप संथ गतीने निर्माण होते, ज्यामुळे आग लागण्याचा धोका कमी असतो.

बॅटऱ्यांचे आयुष्मान जास्त काळ

या नवीन बसमध्ये वापरण्यात येणाऱ्या 'लिथियम आयर्न फॉस्फेट' ब्लेड बॅटरीमुळे सध्या एसी बसमध्ये असलेल्या बॅटरीच्या तुलनेत ३० टक्के जास्त ऊर्जा साठवू शकते.

विशेष म्हणजे ही बस एका चार्जवर सलग २ दिवसांपर्यंत धावू शकते. या बॅटऱ्यांचे आयुष्मान ही जास्त काळ असते. पारंपारिक बॅटरीच्या तुलनेत या ब्लेड बॅटऱ्या अतिशय सुटसुटीत आणि ३० टक्के हलक्या असतात.

चार्जिंगच्या पद्धती

इलेक्ट्रिक बसेस प्रामुख्याने चार प्रकारे चार्ज केल्या जातात. डेपो चार्जिंग : बस आपले दिवसभराचे फेरे पूर्ण करून रात्री मुख्य डेपोमध्ये येते, तेव्हा तिला प्लग-इन चार्जरने चार्ज केले जाते. यासाठी साधारण ४ ते ८ तास लागतात.

अपॉर्च्युनिटी चार्जिंग: बस मार्गावर असताना मुख्य बस स्टॉपवर किंवा शेवटच्या थांब्यावर १० ते १५ मिनिटांच्या ब्रेक दरम्यान हाय-पॉवर चार्जरने चार्ज केली जाते. यामध्ये बसच्या छतावर किंवा बस स्टॉपवर एक स्वयंचलित आर्म असतो. त्यामुळे लवकर बस लवकर चार्ज होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT