Rare Manuscripts: राज्यातील पावणे दोन लाख दुर्मीळ हस्तलिखितांचे डिजिटायझेशन; केंद्र सरकारच्या ज्ञानभारतम उपक्रमाला संस्थांचा प्रतिसाद

केंद्र सरकारच्या ‘ज्ञान भारतम’ उपक्रमातून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे काम; संस्था आणि वैयक्तिक संग्राहकांकडील हस्तलिखितांचे सर्वेक्षण
Rare Manuscripts
Rare ManuscriptsPudhari
Published on: 
Updated on: 

अनुपमा गुंडे

ठाणे: राज्यातील विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक, संशोधन संस्था आणि वैयक्तिक असलेल्या दुर्मीळ हस्तलिखितांच्या खजिन्याचे डिजिटायझेशन करण्याचा उपक्रम केंद्र सरकारने ‘ज्ञान भारतम’च्या माध्यमातून हाती घेतला आहे.

राज्यात विविध संस्था आणि वैयक्तीक संग्राहकांकडे सुमारे ७ लाख १ हजार ८५९ दुर्मीळ हस्तलिखिते सर्वेक्षणात आढळली असून यातील सुमारे १ लाख ७५ हजार हस्तलिखितांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे.

दुर्मीळ हस्तलिखितांमध्ये असलेले ज्ञान भांडाराचे जतन आणि संवर्धन कसे करायचे, हा प्रश्न राज्यातील ऐतिहासिक, संशोधन संस्था तसेच वस्तु संग्रहालयापुढे आहे. या दुर्मीळ साहित्याचे जतन करून तो अभ्यासक, संशोधक व इतिहासप्रेमींसाठी खुला करण्यात यावा यासाठी केंद्र सरकारने देशभर अशा हस्तलिखितांचे सर्वेक्षण ज्ञान भारतम उपक्रमाद्वारे सुरू केले आहे.

Rare Manuscripts
Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडवर वाहतूक नियमांचे उल्लंघन; १२ हजारांहून अधिक गुन्हे, हजारो प्रकरणे प्रलंबित

महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या पुराभिलेख संचानलायतंर्गत या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. पुराभिलेख संचालनालयाने केलेल्या पाठपुराव्याने राज्यातील संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी दिली.

या दुर्मीळ हस्तलिखितांच्या जतनासाठी केंद्र सरकारने सीबीएसपीएल या संस्थेकडे डिजीटायझशेनचे काम सोपवले आहे. या संस्थेच्या वतीने पुण्यातील भांडारकर इन्सिट्यूट, भारत इतिहास संशोधन मंडळ, आनंदाश्रम आणि रामटेक येथील कवी कालिदास विद्यापीठातील दुर्मीळ हस्तलिखितांच्या डिजीटायझेशनचे काम सध्या सुरू आहे.

दुर्मीळ हस्तलिखितांमध्ये काय आहे?

धार्मिक पोथ्या, गणित, खगोल शास्त्र, तत्वज्ञान, भाषा, व्याकरण, संस्कृत, भविष्य, उर्दू, पार्शियन भाषेसह अनेक दुर्मीळ साहित्याचा खजिना आहे. या संस्थांकडील खजिन्याचे सीबीएसपीएल ही संस्था डिजीटायझेशन करणार असून त्यानंतर हा खजिना नॅशनल डिजीटल डिपॉझटरीच्या माध्यमातून ज्ञान भारतम ॲपवर अभ्यासक, संशोधकांना उपलब्ध होणार आहे.

कोणत्या विभागात किती हस्तलिखिते आढळली?

पुणे ४,३०,६३८

मुंबई ६०,४४७

नाशिक ३९,५८८

कोल्हापूर २८,८७५

सातारा २५,४६७

छ. संभाजीनगर २४,९००

नागपूर २३,३५२

सोलापूर १७,९८३

अहिल्यानगर १०,४७१

राज्यातील विविध संस्था, ग्रंथालये, मठ-मंदिरे, अशा ३५१ विविध ठिकाणांहून ७ लाखांहून आधिक हस्तलिखितांचा शोध घेऊन नोंदणी करण्यात आली आहे. विविध लिपी व भाषांतील हस्तालिखितांचा यात समावेश आहे, ही हस्तलिखिते स्कॅन करण्याचे काम सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राचा समृध्द वारसा जतन करण्याच्या प्रयत्नांना यश येणार आहे, तसेच या माध्यमातून प्राचीन ज्ञानाचा खजिना, संशोधक, विद्वान आणि सामान्य जनतेसाठी खुला होणार आहे.

-सुजीत कुमार उगले संचालक, पुराभिलेख संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news