आशिष शेलार 
मुंबई

आशिष शेलार : राज्य सरकार आणि एटीएस झोपलं होतं का?

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या इशार्‍यावर महाराष्ट्रासह तीन राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्याचा पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी कट मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने उधळून लावला.

या घटनेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. पोलिसांना नको त्या विषयात गुंतवलं असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य सरकार आणि एटीएस झोपलं होत का? अशी विचारणा त्यांनी केली. सरकार केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात मग्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दुसरीकडे मुंबईत धारावीत राहणार्‍या जान मोहम्मद शेख याच्यासह राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

ऐन दिवाळी दसर्‍यात कुठे आणि कसे घातपात घडवायचे याचे प्रशिक्षण या टोळीला डॉन दाऊदचा सख्खा भाऊ अनिस इब्राहिम देत होता. पाकची पातळयंत्री गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अनिसला हे घातपाताचे कंत्राट दिले होते.

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रांस्त्रांसह स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिस दलातील स्पेशल सेलने एकाच वेळी अनेक राज्यांत हे मल्टीस्टेट ऑपरेशन करून पाकचे मनसुबे उधळले.

हे दहशतवादी महानगरांतून स्फोट घडविण्याच्या बेतात होते. तत्पूर्वीच दिल्ली स्पेशल सेलच्या गोपनीय नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचे बिंग फुटले. दहशतवाद्यांच्या ताब्यातून काही गोपनीय दस्तावेजही दिल्ली पोलिसांच्या हाती लागले आहेत. सर्व जणांची एकत्रित व स्वतंत्रपणे कसून चौकशी करण्यात येत आहे.

ओसामा, झिशान कमर, मोहम्मद अबू बकर, जान मोहम्मद शेख, मोहम्मद आमिर जावेद आणि मूलचंद लाला अशी या अटक करण्यात आलेल्या पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांची नावे आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात नवरात्री, रामलीला दरम्यान गर्दीच्या ठिकाणी या दहशतवादी संघटनेचा स्फोट घडवण्याचा कट होता. पाकची पाताळयंत्री गुप्तहेर संघटना आयएसआयने या घातपाताची जबाबदारी अनिस इब्राहीमवर सोपवली होती.

या सर्वांना अनिस थेट प्रशिक्षण देत होता. या अतिरेक्यांपैकी ओसामा आणि झिशान या दोघांनी याच वर्षी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आणि भारतात परतल्यापासून त्यांना सतत आयएसआयकडून सूचना येत होत्या. अत्यंत शक्तिशाली आयईडी स्फोटके पेरण्यासाठी ठिकाणे निवडण्यास त्यांना सांगण्यात आले होते.

हे ही वाचलं का? 

[visual_portfolio id="37929"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT