Asha Bhosle Health Update Pudhari
मुंबई

Asha Bhosle Health Update: आशा भोसले रुग्णालयात दाखल, ICU मध्ये उपचार सुरू

breach candy hospital: ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, त्‍यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु

Namdev Gharal

Asha Bhosle admitted breach candy hospital

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना शनिवारी संध्याकाळी (11 एप्रिल 2026) प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘माझी आजी आशा भोसले यांना प्रचंड थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे', अशी माहिती आशा भोसलेंची नात जनाई नात यांनी इन्स्टाग्रामद्वारे दिली.

शनिवारी संध्याकाळी 92 वर्षीय आशा भोसलेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा भोसलेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भाजपा आमदार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार ब्रीच कँडी रुग्णलयात पोहोचले. 'मी आशा भोसलेंच्या कुटुंबियांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी भेट होऊ शकली नाही', असे शेलार यांनी पुढारी न्यूजला सांगितले. तर एका इंग्रजी वृत्तपत्राला ब्रीच कँडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, जनाई भोसलेंनी पोस्टद्वारे सर्व चाहत्यांना आवाहनही केले आहे. 'कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आम्ही विनंती करतो.सर्व काही ठीक होईल, अशी आम्हाला आशा आहे. तसेच या संदर्भात आम्ही तुम्हाला लवकरच माहिती देऊ' असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सर्व प्रकारच्या गाण्यांमधून आवाजाची जादू

आशा भोसले यांनी गायकीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविधांगी प्रकारच्या व विविध भाषांमधून त्‍यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या तोडांवर असतात. मोठी बहीण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल टाकत त्‍यांनी गायन क्षेत्रात प्रवेश केला. भोसले यांची दैदीप्यमान कारकीर्द त्यांच्या अविश्वसनीय बहुआयामी प्रतिभेमुळे ओळखली जाते, ज्यात भावपूर्ण गझलांपासून ते जोशपूर्ण कॅबरे गीतांपर्यंत विविध प्रकारांचा समावेश आहे.

ओ.पी. नय्यर यांच्यासोबतच्या त्यांच्या भागीदारीतून 'आओ हुजूर तुमको' हे प्रसन्न गीत जन्माला आले आणि आर.डी. बर्मन यांच्यासोबतचे त्यांचे अजरामर गाणे, 'चुरा लिया है तुमने जो दिल को', आजही अविस्मरणीय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT