Kasara railway block 2026, pudhari photo
मुंबई

Kasara railway block 2026 : कसारा येथे १२ दिवसांचा विशेष ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या, मेल / एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आसनगाव - कसारा दरम्यान तिसरी रेल्वे लाईन तसेच कसारा यार्ड लाईनच्या विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून येत्या ७ ते १८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १२ दिवसांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या, मेल / एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होणार असून काही गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.

या लोकल गाड्यांवर होणार परिणाम :

सीएसएमटी - कसारा लोकल १३:१०, १४:१७, १४:१७,१४:४६ आणि १६:५० या गाड्या आसनगाव येथे थांबविल्या जातील. कसारा- सीएसएमटी लोकल १५: ३५, १६:१६,१७:०२ आणि १८:१७ आसनगांव येथून सोडल्या जाणार आहेत.

मेल आणि एक्सप्रेस उशिरा धावणार

१२१७७ - एलटीटी-बनारस एक्सप्रेस

१२१४१ - एलटीटी-पाटलिपुत्र एक्सप्रेस

११०५७ - सीएसएमटी-अमृतसर एक्सप्रेस

२२१७७ - सीएसएमटी-बनारस महानगरी एक्सप्रेस

०७ ते ८ ऑक्टोबर - १५:३५ ते २०: ३५ वाजेपर्यंत

०९ ऑक्टोबर रोजी - ००: ३० ते ०५: ३० वाजेपर्यंत

ब्लॉकचा विभाग

कसारा- खर्डी आणि उमाली- कसारा अप मेन आणि डाउन लाइन, प्लॅटफॉर्म नंबर १,३,४, आणि अप यार्ड असे असून या दरम्यान लोकल सेवा उपलब्ध असणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT