Thane FDA action : दूध विक्री केंद्रांवर एफडीएचा बडगा

ठाणे, नवी मुंबई परिसरात ६१७ लिटर दूध जप्त; विनालेबल-कमी दर्जाची दूधविक्री
Thane FDA action
Thane FDA actionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील दूध विक्री केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत ६१७ लिटर सैल दूध जप्त केले. विनालेबल स्वरूपात विक्री, तसेच दूध कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून कळवा, उरण आणि उलवे येथील पाच आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या दुधाची एकूण किंमत ३८ हजार ९१४ रुपये आहे. दरम्यान, मुंबईसह कोकण विभागात प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधातही एफडीएने मोठी मोहीम राबवली असून ११ आस्थापनांची तपासणी करताना २३ लाख १६ हजार १६७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

कळवा येथील प्रतीक मिल्क शॉपीमध्ये तपासणी केली असता २५ लिटर पाश्चराइज्ड म्हशीचे आणि १२ लिटर गायीचे, असे एकूण ३७ लिटर सैल दूध आढळले. हे दूध विनालेबल आणि कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले. त्याची किंमत २ हजार ६७० रुपये आहे. लक्ष्मी डेअरी, कळवा येथे पाच लिटर म्हशीचे आणि आठ लिटर गायीचे, असे १३ लिटर दूध जप्त करण्यात आले. त्याची किंमत ८१८ रुपये आहे. आर.के. डेअरीमध्ये ३० लिटर म्हशीचे आणि २० लिटर गायीचे, असे ५० लिटर दूध जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३ हजार ३४० रुपये आहे.

Thane FDA action
Mumbai municipal history : महापौरांसोबत सावलीसारखे वावरणारे द्वारपाल झाले इतिहासजमा

उरण येथील तुळजाई डेअरीमध्ये तब्बल ३५० लिटर सैल कच्चे दूध आढळले. त्यात २१० लिटर म्हशीचे आणि १४० लिटर गायीचे दूध होते. या दुधाची किंमत २४ हजार ३६० रुपये आहे. दूध कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून ते जप्त करण्यात आले. उलवे येथील आरती डेअरीमध्येही १६७ लिटर सैल म्हशीचे दूध जप्त करण्यात आले. त्याची किंमत १३ हजार २६ रुपये आहे. अशा प्रकारे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील या पाच कारवायांमध्ये एकूण ६१७ लिटर दूध जप्त करण्यात आले.

बनावट ‘अमूल’ चीजचा साठाही जप्त

पुणे जिल्ह्यात उरुळी देवाची येथे ‘अमूल’ नावाने बनावट किंवा चुकीच्या लेबलिंगचे चीज विक्रीसाठी साठवण्यात आल्याचे आढळले. एफडीएने सुमारे ४३० किलो चीज, किंमत २ लाख ५७ हजार १६४ रुपये, जप्त केले. पुण्यातील अन्य कारवायांमध्ये संशयित निकृष्ट व चुकीच्या लेबलिंगचे बालुशाही, ज्युसी स्टिक, गुलाबजामून, पापडी-नमकीन आणि पुरी-नमकीन जप्त करण्यात आले. वारजे येथील एका डेअरीत अनिवार्य लेबल घोषणांशिवाय तुपाची पाकिटे विक्रीसाठी पुरविल्याचेही आढळले.

Thane FDA action
Mumbai APMC onion potato market : मुंबईकरांचे कांदा-बटाट्याचे वांधे होण्याची चिन्हे

बीडमध्ये परवाना निलंबित

बीडमधील ढोले फूड प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित करून आस्थापना तात्काळ बंद करण्यात आली. नवीन जागेसाठी वैध परवाना नसताना उत्पादन सुरू करणे, जुन्या जागेचा परवाना क्रमांक लेबलवर वापरणे, अन्न सुरक्षा व्यवस्थापन, कामगारांची वैद्यकीय नोंद अशा त्रुटी आढळल्या. एक लाख १७ हजार ४६० रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.

कोकणात ६ एफआयआर; आठ जणांना अटक

  • एफडीएच्या विभागनिहाय कारवाईत कोकण विभागात ११ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले. २३ लाख १६ हजार १६७ रुपयांचा साठा जप्त, सहा एफआयआर, आठ जणांना अटक केली.

  • नऊ आस्थापना सील करण्यात आल्या. तसेच सहा लाख रुपये किमतीचे एक वाहन जप्त करण्यात आले. पुणे विभागात तीन आस्थापनांवर कारवाई करून ३० लाख सहा हजार ३८१ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तीन एफआयआर दाखल करून चार जणांना अटक तर तीन आस्थापना सील करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news