मुंबई : आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयातून किल्‍ला कोर्टात नेण्यात आले. आर्यनला अटक केल्यापासून त्याच्या डोक्यावर दरदिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या दिसतात. 
मुंबई

Drugs case: आर्यन खानच्‍या जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी

नंदू लटके

[toggle title="" state="open"]मुंबई : पुढारी ऑनलाईन[/toggle]

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात ( Drugs case ) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा न्‍यायालयीन कोठडीतील मुक्‍काम वाढला आहे. आज त्‍याच्‍या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी दोन दिवसांचा कालावधी देण्‍यात यावा, अशी मागणी केल[. ही मागणी मान्‍य करत न्‍यायालयाने बुधवारपर्यंत या जामीन अर्जावरील सुनावणी स्‍थगित केली. आता बुधवारी Drugs case ) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्‍या जामीन अर्जावर सुनावणी हाेणार आहेत.

एनसीबीच्या पथकाने शनिवारी २ ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करून ( Drugs case ) आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमिचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा अशा आठ जणांना काही प्रमाणातील ड्रग्ज आणि रोख रकमेसह ताब्यात घेत ( Drugs case ) चौकशी सुरू केली. एनसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल करून 3 ऑक्टोबरच्या दुपारी आर्यन याच्यासह अरबाज आणि मुनमुन हिला अटक केली होती.

यानंतर न्‍यायालयाने त्‍याचा जामीन अर्ज फेटाळला होता. सोमवारी पुन्‍हा एकदा त्‍याच्‍या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला. आर्यन खान याच्‍याकडे ड्रग्‍ज सापडले नाहीत. तसेच अन्‍य संशयित आरोपींबरोबर त्‍याचा कोणताही संपर्क नव्‍हती. त्‍याचबरोबर आर्यन खान हा ड्रग्‍जचे सेवन करत होता, याचे कोणताही पुरावा मिळालेला नाही, या आधारेच पुन्‍हा एकदा जामीन अर्ज करण्‍यात आला आहे, अशी माहिती आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली होती.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT