मुंबई : मुंबई मध्यवर्ती कारागृहात (आर्थररोड ) कैद्याने पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडली. हनी बाबुराव वाघ असे जखमी पोलिसाचे नाव आहे. तर लोकेंद्र उदय सिंग रावत असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. घडल्याप्रकरणी एन. एम.जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
वाघ हे सशस्त्र पोलीस विभाग-2 ताडदेव येथे कार्यरत आहेत. 27 जानेवारी सकाळी ते 8 वाजता 24 तासाच्या ड्युटी साठी आले. त्याना तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ड्युटी साठी नेमले होते.
रात्री 9 वाजताच्या सुमारास सशस्त्र पोलीस विभागाचे पोलीस शिपाई सुरेश संडू माळी आणि सचिन चव्हाण याने रावत ला दिंडोशी न्यायालयातून तुरुंगात आणले. तेव्हा रावत हा संतप्त झाला होता. तुरुंगाच्या आवारात प्रवेश केल्यावर तो गेटजवळ बसला. त्यानंतर त्याने पोलीस शिपाई याना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाघ याने त्याला शांत राहण्यास सांगितले. मात्र रावत हा अधिकच आक्रमक झाला. रावत ने अचानक वाघ याच्या नाकावर धडक मारली. नाकावर धडक मारल्याने वाघ हे जखमी झाले. त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. या घटनेची माहिती तुरुंग अधिकाऱ्याला दिली. घडल्या प्रकरणी एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.