APMC Navi Mumbai Pudhari
मुंबई

APMC Navi Mumbai: मुबलक आवकेमुळे भाजीपाला स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा

घाऊक बाजारात कोबी 6, तर फ्लॉवर 10 रुपये किलो

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : एपीएमसीच्या घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत. कोबी 6 ते 8 रुपये, फ्लॉवर 10 ते 16 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. हिवाळ्यातील हवामान भाज्यांसाठी अनुकूल असते. त्यामुळे या हंगामात भाज्यांचे चांगले उत्पादन होते. बाजारात चांगल्या, ताज्या हिरव्या भाज्या उपलब्ध होतात. यावेळी मात्र पावसाळा लांबला आणि हिवाळाही उशिराने सुरू झाला.

डिसेंबरपासून वाढणारी भाजीपाल्याची आवक आता जानेवारी अखेरपासून वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बाजारात चांगल्या ताज्या हिरव्या फळभाज्या, पालेभाज्या उपलब्ध होत आहेत आणि त्याचे दरही आवाक्यात आले आहेत.

टोमॅटो आणि मटारचे दर सर्वाधिक खाली आले आहेत. बाजारात महाराष्ट्राबरोबरच हिमाचलमधूनही हिरव्या वाटाण्यांची आवक होत आहे. त्यामुळे बाजारात सध्या दररोज 30 ते 35 गाड्या हिरवा मटार येत आहे.

आवक मुबलक असल्याने मटारचे दर खाली आले आहेत, अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे. घाऊक बाजारातच दर कमी झाल्याने किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर समाधानकारक आहेत. किरकोळ बाजारातही भाज्या 50 ते 60 रुपये प्रतिकिलोच्या घरात उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT