मुंबई : बेस्ट आगारातील बसला आगी लागण्याचे प्रमाण अजूनही कमी होत नाही. सोमवारी आणिक बस आगारात त्याचा पुन्हा प्रत्यय आला. pudhari photo
मुंबई

Mumbai BEST Bus Fire : आणिक आगारात १० एसी बस खाक

डागा कंत्राटदाराच्या ६ नवीन आणि ४ जुन्या गाड्यांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आणिक बेस्ट बस आगारात उभ्या असलेल्या एका सीएनजी कंत्राटी बेस्ट सोमवारी संध्याकाळी लागलेली आग भडकून तेेथेच उभ्या इतर ९ एसी बसेस जळून खाक झाल्या. त्‍यात ६ नवीन तर ४ जुन्या बस गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या डागा या कंत्राटदाराच्या होत्या.

मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी पाऊणे सहाच्या दरम्यान आणिक बेस्ट बस डेपोमध्ये एका रिकाम्या सीएनजी बेस्ट बसला प्रथम आग लागली. पाहता पाहता या आगीने उग्र रूप धारण केले.

आगीच्या धुराचे लोट दूरवर दिसत होते. बेस्ट कर्मचाऱ्यांनी ही आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र वाढत्या उष्णतेमुळे अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत आग वेगाने पसरली. या आगीच्या प्रचंड लोळात अन्य ९ बेस्ट बस सुद्धा भक्ष्यस्थानी पडल्या.

अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळेपर्यत वातानुकूलित १० सीएनजी बस जळून खाक झाल्या. या आगीला किरकोळ श्रेणीतील आग म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरी ही या आगीमुळे कंत्राटी बेस्ट गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वर्षभरात बेस्ट बसला लागलेल्या आगीच्या घटना

  • १७ फेब्रुवारी २०२६ - कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर चालत्या बसच्या टायरला आग

  • ३ मे, २०२६ - कुर्ला डेपो मध्ये डबल-डेकर बसला आग

  • २५ मे, २०२६ - प्रतीक्षानगर येथे एसी बसमधून धूर येऊन आग

  • ८ सप्टेंबर २०२६ - गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या खाली बसला आग

  • १३ सप्टेंबर २०२६ - चेंबूर कॅम्पजवळ माहुल गाव ते ट्रॉम्बे दरम्यान इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट आग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT