Mira Road knife attack pudhari
मुंबई

Mira Road knife attack: धर्म विचारला, कलमा पढायला लावला अन् दोन सुरक्षा रक्षकांना भोसकलं; अमेरिका रिटर्न तरूण ATS च्या ताब्यात

Anirudha Sankpal

Mira Road Knife Attack News: मुंबईतील नया नगर भागातून एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. या युवकाने दोन सुरक्षा रक्षकांना धर्म विचारून त्यांच्यावर चाकून वार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झैब झुबेर अन्सारी या ३१ वर्षाच्या तरूणाने सुरक्षा रक्षकांना कलमा पडण्यास सांगितलं होतं.

जखमी सेन यांना शेख यांनी केली मदत

सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा आणि सुब्रोतो सेन हे बांधकास सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये काम करतात. त्यांच्यावर आरोपीने सोमवारी हल्ला केला. ही घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झाली. हे दोन्ही सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिश्रा हे रूग्णालयात स्वतः जाऊ शकले मात्र सेन यांना दोन लोकांनी आधार देऊन रूग्णालयात दाखल केलं.

शेख हे या इमारतीशेजारीच राहतात ते सकाळी आपल्या कामावरून परत येत असताना त्यांना सेन हे रक्तबंबाळ अवस्थेत गार्ड केबीनमध्ये असल्याचे दिसले. त्यांनी आधी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं त्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

पोलिसांनी त्वरित मुसक्या आवळल्या

दरम्यान, दोन सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणाऱ्या अन्सारीला पोलिसांनी ९० मिनिटात अटक केली. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज स्कॅन केलं अन् त्याला ताब्यात घेतलं आहे. अन्सारीला नया नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि दोन गटात शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्सारीला न्यायालयात हजर केलं असता त्याला ४ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आता स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि चुकीची माहिती पसरवू नका अशी विनंती केली आहे. जर कोणी चुकीची माहिती पसरवली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं आहे.

मोठ्या कटाचा भाग?

तपास यंत्रणा अन्सारीचा मोबाईल तपासत आहेत. तसेच त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक डिवाईस देखील जप्त करण्यात आले आहेत. याद्वारे पोलीस हा एकमेव हल्ला होती की हा एका मोठ्या कटाचा भाग होता याचा देखील तपास करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'ISIS', 'lone wolf', 'jihad', and 'Gaza हे शब्द लिहिलेल्या नोट्स अंसारीकडे सापडल्या आहेत.

सूत्रांनी असा देखील दावा केला आहे की, अन्सारी हा अनेक वर्षे अमेरिकेत राहात होता. अन्सारीचे कुटुंबीय अजूनही अमेरिकेत राहतात. त्याला तिथे नोकरी मिळाली नाही म्हणून तो भारतात परत आला आहे. तो मीरा रोड भागात एकटा राहतो. तो पोटापाण्यासाठी ऑनलाईन केमेस्ट्रीचे क्लासेस घेत होता. तपास यंत्रणांना त्याच्याकडे जे काही ऑनलाईन मटेरिअल मिळालं आहे त्याद्वारे त्याला कट्टरवादाकडे वळवण्यात आले असावे असा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT