AI Living Lab Maharashtra Pudhari
मुंबई

AI Living Lab Maharashtra: देशातील पहिली ‌‘एआय लिव्हिंग लॅब‌’ महाराष्ट्रात, जर्मनीचे सहकार्य

जर्मनीचे सहकार्य, उद्योगांना मिळणार मोठे तांत्रिक बळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उद्योगसमूह आणि लघुउद्योगांना तांत्रिक बळ देणारी देशातील पहिली ‌‘एआय लिव्हिंग लॅब‌’ राज्यात सुरू झाली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन झाले. जर्मनीच्या सहकार्याने साकारलेला हा प्रकल्प उद्योग, शिक्षण आणि शासन यांना एका व्यासपीठावर आणणारा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे लोढा यावेळी म्हणाले.

उद्घाटनप्रसंगी जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री बार्बेल कॉफ्लर, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू अपूर्वा पालकर, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टॉप हेलिर तसेच उल्करे एबेलींग आदी उपस्थित होते. यावेळी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

मंत्री लोढा म्हणाले, प्राचीन भारतात उद्योग क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ‌‘स्वदेशी‌’च्या संकल्पनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भारताला जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचे धोरण राबवले जात असून ‌‘एआय लिव्हिंग लॅब‌’ हा त्याच प्रयत्नांचा भाग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT