मुंबईतील एक हजार महिलांची कर्करोग तपासणी pudhari photo
मुंबई

Women cancer awareness camp : मुंबईतील एक हजार महिलांची कर्करोग तपासणी

शहर, उपनगरांत 30 ठिकाणी शिबिरे, पोर्टेबल डिव्हाइसचा वापर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत 30 ठिकाणी आयोजित शिबिरांमधून एक हजार महिलांची मोफत, नॉन-इन्वेसिव्ह ब्रेस्ट तपासणी करण्यात आली. या उपक्रमात एआय-समर्थित पोर्टेबल डिव्हाइसचा वापर करण्यात आला. ज्यामुळे महिलांना सोयीस्कर, वेदनारहित आणि त्वरित तपासणीची सुविधा मिळाली.

रोटरी क्लब ऑफ मुंबई नोवा आणि डिस्ट्रिक्ट 3141 मधील विविध रोटरी क्लब्सनी यूई लाइफसायन्सेससोबत आयोजित केलेला रोटरी सर्विस डे उपक्रमादरम्यान या शिबीरांचे आयोजन केले होते.

एसडब्ल्यूईएस स्कूल (सांताक्रूझ), बीएमसी क्लिनिक (गोरेगाव पूर्व), लक्ष्मी नारायण बाग (माहिम), राहुल नगर मुलुंड कॉलनी, महाराष्ट्र नगर (मानखुर्द), चिन्मय नर्सिंग होम (वडाळा), आयआयटी पवई सिनेमा ग्राऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल (विक्रोळी) तसेच शहरातील इतर ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली. प्रत्येक शिबिरात सरासरी 40 ते 50 महिलांची तपासणी करण्यात आली,

पश्चिम, मध्य, दक्षिण, वायव्य आणि उत्तर मुंबईतील 30 हून अधिक रोटरी क्लबना एकत्र आणून या शहरव्यापी समन्वयित प्रयत्नामधून रोटरीचे अविरत मिशन सर्विस अबव्ह सेल्फ दिसून आले. जे सहयोग, आत्मीयता आणि नाविन्यतेच्या माध्यमातून आरोग्यदायी समुदाय निर्माण करण्यास मदत करेल.

काय आहे आयब्रेस्टएक्झाम

महिलांची तपासणी आयब्रेस्टएक्झामच्या माध्यमातून करण्यात आल्या. या डिव्हाइस कर्करोगाचे लवकर निदान सहज, किफायतशीर आणि विनासायास करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. आयब्रेस्टएक्झाम हे हाताळण्यास सोपे, वेदनारहित, रॅडिएशन-मुक्त आणि नॉन-इनव्हेसिव्ह उपकरण असून, ते स्तनाच्या ऊतींमधील लवचिकतेतील सूक्ष्म फरक ओळखते आणि दृश्यमान लक्षणे दिसण्यापूर्वी असामान्य सुरुवातीची चिन्हे शोधण्यात मदत करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT