Burglary File Photo
मुंबई

Aarey Colony Burglary Case: आरे कॉलनीतील तीन घरफोड्यांचा पर्दाफाश; 40 हून अधिक गुन्ह्यांतील तिघे सराईत आरोपी अटकेत

अहमदाबादमधून मुख्य आरोपीला अटक; दिंडोशी व आरे पोलीस ठाण्यात अनेक घरफोड्यांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

स्टॅलिनविरुद्ध दिंडोशी व आरे पोलीस ठाण्यात प्रत्येकी दहा असे वीस गुन्हे, तर अनिल आणि अब्दुल यांच्याविरुद्ध दिंडोशी पोलीस ठाण्यात 39, तर आरे पोलीस ठाण्यात 1 अशा 40 हून अधिक घरफोड्यांच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

मुंबई : जानेवारी महिन्यात गोरेगाव येथील आरे कॉलनीत झालेल्या तीन घरफोड्यांचा पर्दाफाश करण्यात आरे पोलिसांना यश आले आहे. स्टॅलिन चार्लिस कोंडर, अनिल लहान्या जिंबल ऊर्फ अल्बर्ट अणि अब्दुल लतिफ हमीद अन्सारी ऊर्फ खोटा या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध 40 हून अधिक घरफोड्यांसह इतर गुन्ह्यांची नोंद आहे.

कलायेलुमलाई ही वयोवृद्ध महिला गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनीतील एका निवासी इमारतीमध्ये राहते. नोव्हेंबर 2025 रोजी ती तिच्या तामिळनाडूच्या गावी गेली होती. तिचा जावई जयगणेश कृष्णमूर्ती हा 19 जानेवारीला सासूच्या घरी गेला असता चोरी झाल्याचे दिसून आले. कपाटातील अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून पलायन केले होते.

या घटनेनंतर अशाच प्रकारे आरे कॉलनीत अन्य घरफोडींच्या घटना घडल्या होत्या. घरात प्रवेश करून अज्ञात व्यक्तीने सोन्याचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल पळवला होता. याप्रकरणी आरे पोलिसांनी तीन स्वतंत्र घरफोडींच्या गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला होता. आरोपीचा शोध सुरू असताना यातील स्टॅलिन कोंडरला गुजरातच्या अहमदाबाद, हाटकेश्वर सर्कल परिसरातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या चौकशीनंतर या पथकाने अनिल जिंबल आणि अब्दुल अन्सारी या दोघांना अटक केली. तपासात ते तिघेही सराईत गुन्हेगार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT