पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील धारावी येथे लागलेल्या आगीत ६ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग तीन आणि चार मजली इमारतींमध्ये लागली असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.
पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "ही आग इतर गोष्टींबरोबरच लाकडी साहित्य आणि फर्निचरलाही लागली आहे." एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना औद्योगिक कंपाऊंडमधील एका कापड युनिटला आग लागल्याची माहिती मिळाली होती.
शहर पोलीस, वॉर्डमधील कर्मचारी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
"धारावी परिसरातील काला किला येथील अशोक मिल कंपाऊंडमध्ये पहाटे ३.४५ च्या सुमारास तीन मजली आणि चार मजली इमारतींमध्ये आग लागली," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन दलाच्या किमान १० गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा :