मराठवाडा

हिंगोली : कळमनुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड; सहा दुचाकींसह तीन लाख रुपये जप्त

मोनिका क्षीरसागर

आखाडा बाळापूर (हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : कवडी (ता.कळमनुरी) शिवारातील नवलवाडीजवळ पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकत, सहा दुचाकीसह तीन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधणापोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

यादरम्यान कवडी (ता.कळमनुरी) येथे पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळण्यात येत होता. यादरम्यान पोलिसांनी सावधगिरीने धाड टाकत कारवाई केली. चेतन माधव राव सावंत (वय 22, रा. कळमनुरी), किशन गंगाराम मिजगर (वय 54 रा.नेवरवाडी) तसेच फरार झालेले आरोपी खंडू शंकर सोनाळकर, सुधाकर संभाजी मिजगर (रा. हदगाव) प्रमोद पतंगे (रा. कवडी) अशी आरोपींची नावे आहेत. इतर काही आरोपींची नावे अद्याप समजू शकली नाहीच.

या कारवाईत, पोलिसांडून तीन लाख दहा हजार रुपये सह, एक चेतक नावाची बॅटरी, जुगाराचे पाचशे रुपयाचे साहित्य, पत्ते, आठ हजार रुपये रोख अशी एकूण 3 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण दहा आरोपीवर या गुन्हे दाखल करण्यात आहे आहेतअधिक तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधणापोड यांच्या मार्गदर्शनाखाली एएआय. प्रकाश चोपडे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड पोलीस कर्मचारी नागोराव बाभळे, राजू जमदाडे करत आहेत.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT