मराठवाडा

हिंगोली आगाराच्या बसचालकावर कुत्र्याचा हल्‍ला; चालक गंभीर जखमी

निलेश पोतदार

हिंगोली ; पुढारी वृत्‍तसेवा एसटी बसचालकावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे (रविवार) रोजी पहाटे ५ च्या सुमारास घडली. कुत्र्याने चालकाच्या पायाला, पाठीला चावा घेतला असून, जखमी चालकावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

हिंगोली एसटी आगारात कार्यरत राहुल किसन पाटील (चालक क्र.६०२) व वाहक सिताराम यादव हे १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता हिंगोली- जयपूर मुक्कामी बसफेरी करण्यासाठी गेले होते. १९ मार्चच्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास राहुल पाटील शौचालयात जात असताना एका श्वानाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या पायाला, पाठीला श्वानाने चावा घेतला. यामध्ये अंगावरील कपडेही फाटले.

अशा स्थितीत त्यांनी जयपूर येथून प्रवासी घेत बस कौठा येथे आणली. या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर बस हिंगोली आगारात आणल्यानंतर त्यांच्यावर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. ग्रामीण भागात मुक्कामी बस फेरीसाठी जाणाऱ्या चालक, वाहकांना रात्र एसटी बसमध्येच काढावी लागते. त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नसते. त्यामुळे एसटी चालक, वाहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT