मराठवाडा

बीड : पालीच्या धरणात आढळला नेकनूरच्या युवकाचा मृतदेह

निलेश पोतदार

नेकनूर ; पुढारी वृत्‍तसेवा बीड तालुक्यातील पाली येथील धरणाच्या काठी पँट, आधार कार्ड, घड्याळ व ७५ रुपये ठेवून गायब झालेल्या केशव भिकाजी काशीद (वय २९) रा. नेकनूर सध्या बार्शी नाका, अशोकनगर, बीड) याचा शोध लागलेला नव्हता. आज अखेर त्याचा मृतदेह पालीच्या धरणात नेकनूर ग्रामस्थांना पाहणी करते वेळेस आढळून आला.

केशव काशीद हा मूळचा नेकनूर येथील असून, बीडमध्ये मामाकडे राहतो. ७ फेब्रुवारीला मामा व त्यांचे कुटुंबीय हैदराबादला गेले. त्यानंतर केशव कोठे गेला, त्याचे काय झाले, याचे रहस्य कायम आहे. ८ फेब्रुवारी रोजी पाली येथील तलावाच्या काठी त्याची पँट, त्यात आधार कार्ड, घड्याळ असे साहित्य पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळले होते. त्या नंतर आज (शुक्रवार) नेकनूर ग्रामस्थानी जाऊन शोध घेतला तेव्हा त्यांना केशवचा मृतदेह दिसून आला.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT