मराठवाडा

परभणी : जलसंपदातील लिपीक लाच घेताना रंगेहाथ ताब्यात

backup backup

परभणी; पुढारी वृत्तसेवा : जलसंपदा विभागातील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.2 मधील एका लिपीकाला लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी (दि.1) रंगेहाथ पकडले. अनुकंपाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी 2 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून 1 हजार रूपयांची लाच स्विकारताना ही कारवाई करण्यात आली.  या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत माहिती अशी, जलसंपदा विभागातील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.2 मधील एका कर्मचार्‍याचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुलाने वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर कालवा चौकीदार वर्ग-4 या पदावर नोकरीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. या विभागातील कार्यकारी अभियंता कार्यालयात कार्यरत असलेले लिपीक प्रल्हाद संभाजी गिरी यांच्याकडे त्याने अनुकंपाचा प्रस्ताव औरंगाबाद कार्यालयास पाठवून देण्यासाठी पाठपुरावा चालविला होता. परंतू हा प्रस्ताव पाठविण्यासाठी लिपीक गिरी याने त्याच्याकडे 2 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावर संबंधित मुलाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे याबाबतची तक्रार मंगळवारी दिल्यानंतर खात्याचे पोलीस उपअधिक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, कर्मचारी कटारे, निलपत्रेवार, कदम यांच्या पथकाने लगेचच सापळा रचला. त्यावेळी लिपीक गिरी याने मुलाकडून दोन हजार रूपयाच्या रक्कमेपैकी 1 हजार रूपयाची रक्कम स्विकारला असता पथकाने रंगेहाथ पकडले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT