उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणीशी जवळीक वाढवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब तालुक्यात हा प्रकार घडला.
पोलिसांनी सांगितले की, कळंब तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. संबंधित अल्पवयीन युवतीने दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपीविरुध्द कळंब पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?