मराठवाडा

बीड : गेवराई तालुक्‍यात आज ग्रामपंचायतीची रणधुमाळी!; मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात

निलेश पोतदार

गेवराई ; पुढारी वृत्तसेवा- गेवराई तालुक्यातील आज (दि. १८) ७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अनेक उमेदवार मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारांपर्यंत भूमिका पोहोचविण्याचा उमेदवारांनी प्रयत्‍न केला. आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात केले आहेत, तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येने आहेत. ज्या ठिकाणी मतदान मशीन बंद पडले आहेत, त्या ठिकाणी तात्काळ कर्मचारी पाठवून मशीन सुरू करण्यात येत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT