औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा; औंढा तालुक्यातील देवाळा पाटीजवळ अज्ञात वाहनाने एकाचा अपघात झाला होता. या वेळी गोर बंजारा ब्रिगेडचे पदाधिकार्यांनी याेग्यवेळी केलेल्या मदतीमुळे अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचविले. गणेश सुभाष राठोड ( रा. सवना ब्राह्मणवाडा, बंजारा समाज) असे अपघातग्रस्ताचे नाव आहे.
याबबातची अधिक माहिती अशी की, ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंजाब राठोड, मारुती राठोड (ता.संघटक) व अनिल राठोड (प्र.प्रमुख) यांना अपघाताची माहिती मिळली. त्यांनी तातडीने एका रुग्णवाहिकाची सोय करत अपघातग्रस्त गणेश राठाेड याला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. यानंतर प्रकृती आणखी खालावल्याने त्याला नांदेड येथील दवाखान्यात दाखल केले. येथील उपचारामुळे धाेका टळला.
कार्यकर्त्यानी फोनवरून गणेशच्या नावासोबत पत्ताही शाेधला. या घटनेमध्ये गोर बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंजाब राठोड, तालुका संघटक मारोती राठोड, गोर बंजारा तालुका प्रमुख अनिल राठोड व गोरसिकवाडी गोरसेनाचे अनिल राठोड, एकनाथ राठोड, विजय जाधव ( कळमनुरी पोलिस), प्रविण राठोड, विष्णू चव्हाण आदींनी सहकार्य केले.
हेही वाचलंत का?