केज; पुढारी ऑनलाईन : केज तालुक्यातील तांबवा येथे मागील तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे संतप्त महिलांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून आक्रोश केला.
केज तालुक्यातील तांबवा येथे मागील तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांना पाणी, दळण मिळत नाही. तसेच जनावरांनाही पाणी मिळत नाही. यामुळे संतप्त महिला आणि नागरिकांनी शनिवारी ( दि. १५ एप्रिल) रोजी उपअभियंता अंडील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवले. यावेळी महिलांनी पाण्याचे रिकामे हंडे आपटून प्रचंड रोष व्यक्त केला.
[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
यावेळी रामधन चाटे, अरुण चाटे, विनोद चाटे, ज्ञानेश्वर कराड, गोविंद नागरगोजे, बाळासाहेब ओव्हाळ, नामदेव वायबसे, दत्ता चाटे, शिवकुमार कराड, सचिन चाटे, राहुल कराड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसी जमादार त्रिंबक सोपणे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थीती हाताळली.
हेही वाचा :