केज; पुढारी वृत्तसेवा : केज येथे एका पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका पत्र्यांच्या शेडमध्ये दहा जण तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ३३ हजार ३३० रुपये मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना केज येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनिल टी हाऊसच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेशानंतर सहाय्यक संतोष मिसळे आणि आनंद शिंदे यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते व पोलिस नाईक शमीम पाशा यांच्यासोबत शुक्रवार (दि. ११ नोव्हेंबर) रोजी रात्री ९:३० वा. सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. या छाप्यात जुगार खेलणाऱ्या दहा जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
केज येथील सुरेश बापु काळे (वय ३२, रा. क्रांती नगर), अजिम नजमोद्दीन ईनामदार ( ३० वर्ष, रा. रोजा मोहल्ला ), बाळू अर्जुन गाढवे (४० वर्षे, रा. अहिल्यादेवी नगर), दिपक खंडू काळे (२२ वर्षे, रा . कानडी रोड), ईरफान कश्मीर सय्यद ( २० वर्षे, रा. क्रांती नगर), ईसाक रज्जाक शेख (२४ वर्षे, रा. कोकीसपीर, कानडी रोड), रामभाऊ नारायण चांदने ( ३० वर्ष, रा. समर्थ नगर ), रामेश्वर दत्तात्रय राऊत (४२ वर्षे, रा. लोंढे गल्ली), अमीर शहामोद्दीन ईनामदार (३२ वर्ष, रा. रोजा मोहल्ला), आणि कलीम अहेमद सय्यद (४२ वर्ष, रा. अजीजपुरा, केज) असे दहा जणांची नावे आहेत. पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असे एकूण ३३ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांच्या फिर्यादीवरून सुरेश काळे, अजिम ईनामदार, बाळू गाढवे, दिपक काळे, ईरफान सय्यद, ईसाक शेख, रामभाऊ चांदने, रामेश्वर राऊत, अमीर ईनामदार आणि कलीम सय्यद या दहा जुगाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचलंत का?