पुणे : वसतिगृहांची संख्या वाढवण्याचे आश्वासन; विद्यापीठ विकास मंचचा जाहीरनामा

पुणे : वसतिगृहांची संख्या वाढवण्याचे आश्वासन; विद्यापीठ विकास मंचचा जाहीरनामा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खुल्या विद्यार्थी निवडणुका सुरू करून त्यात पादर्शकतेसाठी प्रयत्न, वसतिगृहांच्या संख्येत वाढ करणार, सांस्कृतिक आणि क्रीडा व्यवस्थांचे सक्षमीकरण, रोजगाराभिमुख शिक्षण, शिकाऊ उमेदवारी आणि निवड योजनेच्या विकासाला गती आदी मुद्द्यांचा समावेश असलेला जाहीरनामा विद्यापीठ विकास मंचने सावित्रीबाई फुले पुणे अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीसाठी जाहीर केला आहे.  विद्यापीठ विकास मंचची भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.

मंचचे समन्वयक राजेश पांडे, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. अपूर्व हिरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे आदी या वेळी उपस्थित होते. अधिसभेतील पदवीधर गटातील दहा जागांसाठीची निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे, तर 21 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. शिक्षण, विद्यापीठ हे पक्षीय राजकारणाच्या वर आहे. संस्थाचालक गट, प्राचार्य गटाच्या निवडणुकीचे चित्र पुढील दोन दिवसांत स्पष्ट होईल. पदवीधर गटाच्या निवडणुकीत 30-35 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होत नाही.

मतदान 60 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. विविध माध्यमांतून प्रचार केला आहे. मतदार नोंदणी वाढवली आहे, असे पांडे यांनी सांगितले. पदवीधर निवडणुकीत पसंतीक्रम पद्धतीचे मतदान होते, ही अत्यंत किचकट प्रक्रिया असते. या निवडणुकीसाठी सहा महिन्यांपासून तयारी केली आहे, असे डॉ. एकबोटे यांनी नमूद केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलचेही उमेदवार पदवीधर गटाच्या रिंगणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचेस्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news