कर्जत : दुकान जाळणारे दोन आरोपी पुण्यात जेरबंद

कर्जत : दुकान जाळणारे दोन आरोपी पुण्यात जेरबंद
Published on
Updated on

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील कुळधरण येथील महिला टेलरिंगच्या दुकानाला आग लावून या दुकानातील सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या साहित्याचे जाळून नुकसान केले.सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून घटनेचा तपास पोलिसांना लावला आहे. यातील दोन आरोपींना पुण्यात जेरबंद करण्यात आले. तालुक्यातील कुळधरण येथील रुपाली क्षीरसागर (वय 23) यांचे 'परी' नावाचे पत्र्याच्या गाळ्यात लेडीज टेलरिंगचे दुकान आहे. यात विक्रीसाठी साड्या, ब्लाउज,अस्तर व इतर साहित्य होते. दि.8 रोजी रात्री दीड वाजता दुकानाच्या शेजारी राहणारे हनुमंत जगताप यांनी रूपाली शिरसागर यांना दुकानाला आग लागली माहिती दिली. क्षीरसागर व तिच्या नातेवाईकांनी दुकानातून धूर येत होता. त्यावेळी दुकानाचे शटर उघडून पाहिता सर्व साहित्य जळत होते. नातेवाईक व जमावाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीत दीड लाख रुपये किमतीचे साहित्य जळालेे.

याप्रकरणी पोलिसांनीअज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आसपासची सीसीटीव्ही यंत्रणा तपासली. त्यावेळी गावातील स्वप्निल उर्फ गजू रमेश धुमाळ व त्याच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती दुकानाला आग लागण्यापूर्वी व आग लागल्यानंतर आसपास दिसले होते. निष्पन्न झालेल्या आरोपी स्वप्निल उर्फ गजू रमेश धुमाळ (रा. कुळधरण, ता. कर्जत) यास सापळा रचून काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे ताब्यात घेतले. त्याने साथीदार सचिन उर्फ पप्पू रामदास क्षीरसागर (रा. पिंपळसुटी, तालुका शिरूर, जि. पुणे) असे असल्याचे सांगितले.
दुसरा आरोपी पुणे येथे नातेवाईकाच्या घरी असल्याची माहिती मिळाल्याने त्यास पुणे येथून रात्रीच ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी हा दुकानदार महिलेचा पती आहे. कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलिस रवी वाघ, जितेंद्र सरोदे, गणेश काळाने यांनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news