कौसडी; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या सारिका ज्ञानेश्वर जीवने विजयी झाल्या. त्यांना 242 मते मिळाली. तर काँग्रेसच्या रफत शेख इम्रान यांना 232, राष्ट्रवादीच्या भाग्यश्री संतोष देशमुख यांना 52 मते, ठाकरे गटाच्या बेबीताई हरिभाऊ पानझाडे यांना 133 मते पडली. तहसील कार्यालयात आज (दि.१९) या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एका जागेसाठी गुरुवारी (दि.18) मतदान झाले. 1149 मतदारांपैकी 662 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. वार्ड क्रमांक सहा मधील भाजपच्या सदस्याचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीत चार उमेदवार रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजप गटाचे सारिका ज्ञानेश्वर जीवने यांना बाजी मारली.
निकालानंतर विजयी उमेदवाराची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हनुमान सोमानी, माजी सरपंच शेख सलीम, तातेराव बारवकर रघुनाथ कडासने शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक अंकुश राठोड, चंद्रकांत कुलकर्णी, ज्ञानेश्वर बारवकर, कैलास राठोड, नाथा ईखे, बालासाहेब बहिरट, बन्सीधर राठोड, महादू तायडे चेअरमन बडू बहिरट, शेख मुख्तार, कैलास राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा