Transplantation of a twenty-foot peepal tree
मानवत, पुढारी वृत्तसेवा :
शहरासह पंचक्रोशीत रोपे तयार करून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी परिचित असलेल्या येथील वृक्षप्रेमी गणेशआप्पा चिंचोलकर यांनी २० फुटी पिंपळाच्या झाडाचे यशस्-वीरीत्या प्रत्यरोपण करण्याचा यशस्वी प्रयोग मानवत शहरात केला आहे.
शहरातील जुने दत्त मंदिर परिसरात वास्तव्यास असलेले गणेश नारायण चिंचोलकर या ७१ वर्षीय अवलियाने मागील ७वर्षांपासून जवळपास ५० हजार रोपट्यांचे मोफत वाटप केले आहे. या वयात अनेकजण आराम करतात, पण गणेशआप्पा हे आपल्या जीवनात नेहमीच्या दिनचर्यासमवेत कामात व्यस्त रा-हूनही अनेक छंद जोपासत आहेत.
त्यातील एक छंद हा वृक्ष लागवडीचा जोपासला आहे. गणेशआप्पा चिंचोलकर यांचा यात्रा कंपनीने भाविकांना देवदर्शन करून आणणे हा मुख्य व्यवसाय आहे. परंतु त्यांनी शिवराज सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून शेतातून काळीमाती आणत विविध झाडांच्या फांद्या तोडून आणून व विविध प्रकारच्या बिजापासून आतापर्यंत पर्यावरणपूरक झाडांची जवळपास ५० हजार रोपटी स्वखर्चान घरातील परसबागेत तयार केली आहेत.
धर्मादाय आयुक्त कार्यालय जालना, सीताराम मठ, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव गात, मंठा तालुक्यातील विडोळी येथील जिल्हा परिषद शाळा व लाल बहादूर शाळा, मानवत न्यायालय, मानवत ग्रामीण रुग्णालय व मानवत तालुक्यातील अनेक शाळांना पर्यावरण-पूरक झाडांची रोपे व वृक्षारोपण केले आहेत.
रस्त्यावर स्टॉल लावून अनेक नागरिकांना रोपट्यांचे मोफत वाटपही त्यांनी केलेल आहे. जन्माच झाड, आठवणीच झाड ही त्यांनी लोकसहभागातून लावले आहेत. तसेच मानवत नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग आहे.
अनेक कार्यक्रमांसह संक्राती वाण,वाढदिवसाची भेट म्हणून संस्थांसह नागरिक हारतुरे न आणता चिंचोलकर आप्पांकडून रोपटे आणून त्याचा वापर स्वागतासाठी करतात. चिंचोलकर आप्पा यांनी आजपर्यंत १० वृक्षांचे वृक्ष प्रत्यार-दिली ोपण केले आहेत. त्यात ६ वृक्ष प्रत्यारोपण यशस्वी झाले आहेत.