Nagnath Bhagwan Kiranotsav : नागनाथांवर सूर्यकिरणांचा अभिषेक; चार दिवस अद्भुत किरणोत्सव file photo
परभणी

Nagnath Bhagwan Kiranotsav : नागनाथांवर सूर्यकिरणांचा अभिषेक; चार दिवस अद्भुत किरणोत्सव

तालुक्यातील हातनूर येथील प्राचीन श्री नागनाथ भगवान मंदिरात सलग चार दिवस सूर्यकिरणोत्सवाचा अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला.

पुढारी वृत्तसेवा

Sun rays anoint Lord Nagnath; a spectacular four-day 'Kiranotsav' (Festival of Rays)

सेलू, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हातनूर येथील प्राचीन श्री नागनाथ भगवान मंदिरात सलग चार दिवस सूर्यकिरणोत्सवाचा अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला. १४ ते १७ सप्टेंबर दरम्यान सकाळी ६:४० वाजता सूर्यकिरणे मंदिर प्रवेशद्वारातून सभामंडप ओलांडून थेट गर्भगृहात पोहोचली. त्यामुळे भगवान नागनाथांच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक झाल्याचा नयनरम्य अनुभव भाविकांना घेता आला.

सूर्यकिरणांचा हा दुर्मीळ क्षण विष्णू सज्जन यांनी कॅमेऱ्यात टिपला. यावेळी पोपा रामचंद्र पारवे, बालासाहेब शेळके, देवस्थान समिती पदाधिकारी, भाविक उपस्थित होते. मंदिर समिती अध्यक्ष बाळासाहेब आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी फाल्गुन वद्य द्वादशी कालावधीतही मंदिरात किरणोत्सवाचा योग जुळला होता. किरणोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, गणित व स्थापत्यशास्त्राच्या प्रगत ज्ञानाची साक्ष देणारा असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

मंदिर उभारणी करताना सूर्याची दिशा, वर्षभरातील सूर्याच्या मार्गातील बदल व प्रकाशाचा कोन यांचा सूक्ष्म विचार तत्कालीन स्थपतींनी केला असावा, असे इतिहासतज्ज्ञ व मंदिर स्थापत्याचे अभ्यासक प्रा. आत्माराम शिंदे यांनी सांगितले. पृथ्वीचा अक्ष सुमारे २३:०५ अंशांनी झुकलेला असल्याने वर्षभर सूर्यकिरणांचा कोन बदलतो. विशिष्ट कालखंडात सूर्यकिरणांची दिशा मंदिर वास्तूशी जुळल्याने ते थेट गर्भगृहात पोहोचतात. त्यामुळे हातनूर येथे वर्षातून दोन वेगवेगळ्या कालखंडांत हा किरणोत्सव अनुभवता येतो.

यंदा चैत्र शुक्ल सप्तमीपासून तीन दिवस किरणोत्सवाचा योग आला. नंतर भाद्रपद शुक् तृतीयेपासून पुन्हा सूर्यकिरणे गर्भगृहात पोहोचल त्यामुळे मार्च व सप्टेंबर या दोन्ही कालखंडांत हा प्रका सोहळा अनुभवता येतो. सप्टेंबरमध्ये पावसाळी ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणे थेट गर्भगृह पोहोचण्याचा योग अनेकदा हुकतो. यंदा मात्र पावस उघडीप दिल्याने सकाळी सूर्यकिरणे थेट गाभाऱ्या प्रवेशली. त्यामुळे सप्टेंबरमधील हा दुर्मीळ किरणोत्स अनेक वर्षांनंतर स्पष्ट पाहायला मिळाल्याचे मूर्तीकट अभ्यासक डॉ. सीमा नानवटे यांनी सांगितले.

चालुक्यकालीन वारशाची साक्ष

हातनूर गावात आजही प्राचीन स्थापत्याचा वारसा जतन झाला आहे. येथील मंदिर, शिलालेख व बारवमुळे इतिहास व स्थापत्य अभ्यासकांचे लक्ष या गावाकडे वेधले गेले. तत्कालीन स्थापतींनी मंदिराची रचना करताना विविध भौगोलिक व खगोलीय घटकांचा विचार केल्याचे सूर्यकिरणोत्सवातून स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT